Uddhav Thackeray Uday Samant sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का जातायेत? उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं कारण

Pradeep Pendhare

Nagar Loksabha : महाराष्ट्रात आलेले उद्योग गुजरात पळवले, अशी टीका विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महायुतीवर सातत्याने केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केले आहे. या मुद्यावर काहीसे बॅकफूटवर महायुती पाहण्यास मिळते. मात्र, याच मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फ्रंटफूटवर येत जोरदार टोलेबाजी केली. उद्योग गुजरात जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनाच उदय सामंत यांनी जबाबदार धरले आहे.

'महाराष्ट्रातील पोलिसांना हाताशी धरून उद्योजक अंबानींच्या घराखाली जिलेटिने ठेवणार असू तर, महाराष्ट्रात उद्योग आणि उद्योजक कसे येतील. उद्योजक आमच्यामुळे नाहीतर, माजी मुख्यमंत्र्‍यामुळे पळाले', असा घाणाघाती आरोप मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

'शिर्डीतील एमआयडीसीला 1983 साली बॅरिस्टर रामराव आदिक आणि गोविंदराव आदिक यांनी मंजुरी दिली.या एमआयडीसीचा विस्तार झाल्यास चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू शकतो. त्यासाठी लागणारी सवलत माझ्यावर सोडून द्या", असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा विचार काँग्रेसबरोबर Congress जाण्याचा नव्हता. तोच विचार घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र कामाला लागले असते तर त्यांच्या विषयी सहानुभूती असती. पण तसे झाले नाही. ही निवडणूक नरेंद्र मोदींविरुद्ध कमकुवत नेतृत्व राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे मतदान राहुल गांधींना करायचं की नरेंद्र मोदींना हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

गेल्या पावणेदोन वर्षात कोणालाही अँटीचेंबरमध्ये न बोलविता साडेदहा हजार कोटी रुपये थेट उद्योजकांच्या खात्यात पाठविले. अशोक चव्हाणांनंतर एकही उद्योगमंत्री श्रीरामपूरला भेट द्यायला आला नाही, हे दुर्दैव आहे. दावोसमध्ये तीन लाख 78 हजार कोटी रुपयांचे करार पहिल्यांदाच महाराष्ट्राने केले. त्यातील 65 टक्के अंमलबजावणीही झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात फक्त पाच हजार उद्योजकांची निर्मिती झाली होती, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत शिर्डीत आले होते. शिर्डी एमआयडीसीतील उद्योजकांशी मंत्री सामंत यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, सिद्धार्थ मुरकुटे, शुभम वाघ उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT