Girish Mahajan, Eknath Shinde Sarkarnaama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Municipal Election : जळगाव महापालिकेत भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही खाते उघडलं ; आमदारपुत्र बिनविरोध नगसेवक

Chandrakant Sonawane’s son elected unopposed : शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र बिनविरोध नगरसेवक झाले आहे. यापूर्वी भाजपनेही जळगावात खाते उघडले आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : भाजप व शिवसेना शिंदे गटाने नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही विजयी सलामी दिली असून निवडणुकीपूर्वीच या दोन्ही पक्षांमधील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. जळगावात दोन्ही पक्षांनी खाते उघडले आहे.

जळगाव महानगरापालिकेत भाजपच्या माजी महापौर उज्वला बेंडाळे यांच्या विरोधात दाखल असलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आता शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

जळगाव महापालिकेतील ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीदरम्यान १३५ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने ते बाद झाले असून, उर्वरित ९०३ अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान जळगावच्या १२ मध्ये अ मधून अनिल अडकमोल, १२ व मध्ये उज्वला बेंडाळे, १२ क मधून गायत्री मनोहर बरडे यांना उमेदवारी इंद्रजीत राणे, १२ ड मध्ये नितीन मिळालेली आहे. छाननीदरम्यान बेंडाळे, अपक्ष वैशाली पाटील व प्रभाग १२ व मध्ये भाजपातर्फे उज्वला भारती चोपडे यांचे अर्ज शिल्लक होते.

वैशाली चोपडे यांनी अर्ज चुकीचा भरल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला. तर वैशाल पाटील यांनी प्रभाग १२ मधील इतर तीन वार्डातून देखील अर्ज भरले होते. आणि ड मधील अर्ज बाद झाला. त्यामुळे १२ ब मध्ये उज्वला बेंडाळेया त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा व त्यांची बिनविरोध निवड झाली.

भाजप पाठोपाठ महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही विजयी सलामी दिली असून प्रभाग क्रमांक 18-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आजपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव महापालिकेत शिवसेनेने देखील खाते उघडले असून महायुतीचा दुसरा उमेदवार बिनविरोध झाला आहे.

धुळ्यात दोनजण बिनविरोध

तसेच कल्याण डोबिंवलीमध्येही भाजपने खाते उघडले असून तीथे भाजपच्या तीन महिला उमेदवार बिनविरोध झाल्या आहे. धुळे जिल्ह्यात काल बुधवारी झालेल्या अर्ज छाननीअंती प्रभाग क्रमांक 1 (अ) मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजीत भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर, प्रभाग 6 (ब) मधूनही भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यादेखील बिनविरोध निवडून आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT