Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil : पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिराच्या ठिकाणी ‘ते’ होमहवन अन्‌ जयंतरावांचे सूचक विधान; म्हणाले, ‘आपल्या धोरणाचा नवीन भाग...’

NCP SP Nashik Shibir News : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ता शिबिर होत आहे. त्या शिबिराला जयंत पाटील उशिरा आले. त्या सभागृहाच्या एन्ट्री परिसरात सुरू असलेल्या होमहवन विधीचे त्यांना आश्चर्य वाटले.

Vijaykumar Dudhale

नाशिक कार्यकर्ता शिबिर – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षसंघटना बळकटीकरण आणि रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये शिबिर आयोजित केले.

  1. जयंत पाटील उशिरा पोचले – माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उशिरामुळे नाराजीच्या चर्चा रंगल्या; त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस उशिरा आल्यानं विलंब झाल्याचं स्पष्टीकरण दिलं.

  2. होमहवनाची गंमत – शिबिर स्थळाजवळ मंदिरातील नियमित होमहवन पाहून जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विनोदी टिप्पणी केली, जी चर्चेचा विषय ठरली.

Nashik, 14 September : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षसंघटना बळकटीकरण आणि आगामी निवडणुकीची रणनीती या शिबिरातून ठरविण्यात येत आहे. मात्र, या शिबिरासाठी प्रमुख वक्ते असलेले जयंत पाटील हेच उशिरा पोचले, त्याबाबतची चर्चा सुरू असतानाच जयंतरावांनी शिबिरस्थळी पोचताच त्या ठिकाणी सुरू असलेल्या होमहवनचे त्यांना आश्चर्य वाटले. त्याबाबत त्यांनी भाष्यही केले.

विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील कार्यकर्त्यांचे नाशिक येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

नाशिकमधील शिबिराला खुद्द पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत. मात्र, जयंत पाटील हे शिबिराला उशिरा आले. त्यामुळे माजी मंत्री जयंत पाटील हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या मंडल यात्रेच्या कार्यक्रमालाही जयंत पाटील यांची अनुपस्थिती हेाती, त्यामुळे नाशिकमधील शिबिराला जयंत पाटील हे सकाळी लवकर आले नसल्यामुळे त्यांच्या नाराजी चर्चा सुरू झाली होती. मात्र, खुद्द जयंतरावांनीच त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या उशिरा पोचण्याचे कारण भारतीय रेल्वे आहे. वंदे भारत एक्स्प्रेस उशिरा पोचल्याने मला कार्यक्रमाला यायला उशिरा झाला, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या शिबिराला उशिरा पोचलेल्या जयंत पाटील यांना एका गोष्टीचे मात्र मोठे आश्चर्य वाटले, त्यामुळे त्यांनी तडक ते ठिकाण गाठले आणि पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू असलेल्या ठिकाणी होमहवन सुरू होते. त्याचे जयंतरावांना मोठे कुतुहल वाटले. त्यामुळे होमहवन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन जयंत पाटील यांनी पाहणी केली.

त्याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, आपल्या धोरणाचा नवीन भाग म्हणून होमहवन सुरू केले की काय, हे पाहण्यासाठी गेलो होते. मला वाटलं की दारातच होम चालू आहे, काय भानगड आहे. म्हणून ते होम कोण करताहेत काय आहे याची चौकशी करण्यासाठी गेलो होतो.

स्वामी नारायण मंदिराचे नियमित होमहवन

वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ता शिबिर हे नाशिकमधील स्वामी नारायण मंदिराच्या सभागृहात होत आहे. त्या सभागृहाच्या एन्ट्री परिसरातच मंदिराच्या वतीने नियमितपणे होणारे होमहवन सुरू होते. मात्र, जयंत पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेली पाहणी आणि त्यानंतर केलेले कमेंट यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.

प्र.1: नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर का आयोजित झाले?
उ. – पक्षसंघटना मजबूत करून स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी.

प्र.2: जयंत पाटील उशिरा का पोचले?
उ. – वंदे भारत एक्स्प्रेस उशिरा आल्यामुळे.

प्र.3: होमहवन कोण करत होते?
उ. – शिबिरस्थळाजवळील स्वामी नारायण मंदिरात नियमित होमहवन होत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT