MLA Dhiraj Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Latur News : मध्य गोदावरी खोऱ्यातील लातूरच्या हक्काचे पाणी मांजरा धरणात सोडा !

सरकारनामा ब्यूरो

- विकास गाढवे

Latur News : मध्य गोदावरी खोऱ्यातील अतिरिक्त अनुज्ञेय पाण्यापैकी 4 टीएमसी पाणी लातूरच्या हक्काचे पाणी आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता कमी करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. तरी मांजरा धरणात पाणी सोडण्यात यावे, असे 'लातूर ग्रामीण'चे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा टंचाई निवारणार्थ आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

लातूर Latur जिल्ह्यात होत असलेल्या कमी पर्जन्यामुळे सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मध्य गोदावरी खोऱ्यातील अतिरिक्त अनुज्ञेय पाण्यातून मांजरा धरणाचे स्थैर्यिकरण करावे. याअंतर्गत मांजरा धरणात ४ टीएमसी पाणी हे लातूरच्या हक्काचे पाणी असल्याने ते सोडले गेले तर पाणीटंचाईची झळा कमी करता येणार आहेत.

यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु असून अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करुन लक्ष वेधणार असल्याचेही धिरज देशमुख Dhiraj Deshmukh यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या लातूर, रेणापूर, औसा तालुक्यातील पाणी पुरवठा टंचाई निवारणार्थ उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मांजरा प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या लासरा बराजमधील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी रायगव्हाण मध्यम प्रकल्पात वळवण्या संदर्भातील अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबतचाही पाठपुरावा सुरु असून उपलब्ध पाणी पुरवठा हा विजेअभावी खंडित होवू नये. अनेक ठिकाणची जलजीवन मिशनची कामे अधिकारी, ग्रामस्थ यांनी एकत्र येवून चर्चेतून ती गतीमान करावी. पाणी गळती टाळण्यासाठी बराज व इतर प्रकल्पाची वेळेवर दुरुस्ती करावी. तसेच प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT