Chhagan Bhujbal, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: भुजबळांचा प्रश्न, लोकसभेच्या निकालानंतर पवारांबरोबर कोण राहील?

Sampat Devgire

Chhagan Bhujbal On Sharad pawar: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि शरद पवार गटाचे एकमेकांवर राजकीय हल्ले सुरु आहेत. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला भेट दिली. त्यावरून आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला भेट दिली.

याबाबतची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. त्यावरून आता जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. या संदर्भात भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अनिल देशमुख यांच्या विधानाबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, माझे तटकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी संबंधित घटनेचा इन्कार केला आहे. ते सध्या पालघर येथे आहेत. त्यामुळे त्यांनी पालघर येथे या संदर्भात माध्यमांची संवाद साधावा, अशी सूचना मी त्यांना केली असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांबरोबर कोण राहील?

भुजबळ यांनी अजित पवार गटामध्ये फूट पडेल आणि यातील अनेक नेते शरद पवार (Sharad Pawar) गटात येतील या दाव्यावरही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांच्याबरोबर कोण कोण राहील? हाच मोठा प्रश्न आहे. अनेकांनी आमच्याकडे संपर्क केला आहे. आमच्याकडे येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे. त्यांच्यासाठी आम्ही मंत्रिमंडळातील काही खातीदेखील राखून ठेवली आहेत. त्यामुळे अजित पवार गटातून शरद पवार गटाकडे कोणीही जाण्याची शक्यता नाही, असं भुजबळ म्हणाले.

गिरीश महाजन यांनीदेखील अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, ते म्हणाले, अनिल देशमुखांना किती गांभीर्याने घ्यावे हाच गंभीर विषय आहे. त्यांची आजवरची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. ते स्वतःच शरद पवार यांच्याबरोबर किती काळ राहतील, असा माझा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही, असा टोला महाजनांनी लगावला.

एकंदरीतच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तटकरे शरद पवार यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलवर का गेले असावे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT