devendra fadnavis bharati pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Lok Sabha Election 2024 : बंडोबांना शांत करता करता भाजपाला नाकीनऊ, दिंडोरीत माजी खासदारानं थोपटले दंड

Sampat Devgire

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Bharati Pawar ) यांची वाट खडतर होण्याची चिन्हे आहेत. जनतेच्या नाराजीनंतर आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मतदारसंघाचे तीन टर्म खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण ( Harishchandra Chavan ) यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली आहे. हा महायुतीच्या उमेदवाराला मोठा धक्का आहे.

दिंडोरी मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर पवार ( Bharati Pawar ) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात फारसे स्वागत झाले नव्हते. विविध समस्यांमुळे भाजपच्या उमेदवारापुढे आव्हाने आहेत. त्यात एका नव्या आव्हानाची भर पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेले भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण ( Harishchandra Chavan ) यांची गेल्या निवडणुकीत उमेदवारी कापण्यात आली होती. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांच्या उपक्रदृष्टीने चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या भारती पवार यांना भाजपने उमेदवारी दिली होती. भारती पवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्या.

डॉ. पवार यांना पहिलीच टर्म असूनही पक्षाने आरोग्य राज्यमंत्री पदाची सूत्रे दिली होती. मात्र, त्यांनी मतदारसंघात अपेक्षित विकासकामे केली नाहीत. त्यांनी पाच वर्षात मतदारांशी कोणताही संपर्क ठेवला नाही, असा आक्षेप माजी खासदार चव्हाण यांनी घेतला आहे. ते म्हणाले, "गेल्या पाच वर्षात मतदार तर दूर मला देखील त्या भेटलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मतदारसंघात फिरल्यानंतर कार्यकर्त्यांनी मला उमेदवारीचा आग्रह केला आहे. त्यामुळे मी उमेदवारीचा निर्णय घेणार आहे."

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री डॉ. पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. "मतदारसंघातील शेतकरी कांदा निर्यात बंदीने त्रस्त झाले आहेत. त्यांची अक्षरशः लूट झाली. कांदा उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे. द्राक्षाचे भाव देखील त्यामुळेच कोसळले. यावेळी मतदारसंघाच्या खासदार म्हणून पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. त्या ऐवजी त्या केंद्र सरकारची बाजू मांडत होत्या. त्यामुळे डॉ. पवार यांच्याबाबत जनतेची घोर निराशा झाली आहे. त्यामुळेच मी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार आहे. योग्य वेळी सर्व पत्ते उघड करू," असं चव्हाणांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT