Bhaskar Bhagre  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Lok Sabha Constituency : शरद पवारांचे उमेदवार भगरे खरोखरच सामान्य, त्यांच्याकडे फक्त 'एवढ्या' लाखांची संपत्ती!

Bhaskar Bhagre News : भास्कर भगरे पत्नीसह स्वतःही शिक्षक म्हणून नोकरी करतात

Akshay Sabale

Nashik News, 30 April : दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. भगरे हे शिक्षक आहेत. त्यांच्याकडे अवघी 43 लाखांची चल संपत्ती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल.

भगरे (Bhaskar Bhagre) यांनी सोमवारी, 29 एप्रिलला हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची चल व अचल संपत्ती आणि अन्य तपशील दिला आहे. पत्नी आणि ते दोघेही शिक्षक आहेत. त्या दोघांचे वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भगरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्या विरोधात न्यायालयात कोणताही खटला प्रलंबित नाही. त्यांना कोणत्याही न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिलेली नाही. त्यांच्याकडे दोन लाख रुपये किमतीची मारुती मोटार कार आणि एक मोटारसायकल आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे एक कार व एक स्कूटर आहे. त्या सर्वांचे एकत्रित मूल्य 6 लाख 40 हजार आहे.

भगरे यांनी 24.43 लाखांचे कर्ज घेतलेले आहे. गोंडेगाव दिंडोरी येथे त्यांना वारसा हक्काने वडिलोपार्जित 2.18 एकर जमीन मिळालेली आहे. गोंडेगाव आणि कसबे वणी येथे त्यांचे घर आहे. याशिवाय पिंपळगाव बसवंत येथे एक सदनिका आहे. या सर्व अचल संपत्तीचे मूल्य 93 लाख रुपये आहे.

भगरे यांच्याकडे आयुर्विमा महामंडळाची सहा लाखांची पॉलिसी आहे. पत्नीकडे चार लाखांची पॉलिसी आहे. या कुटुंबाकडे एकूण 17 तोळे सोने असून त्याचे मूल्य 13.25 लाख रुपये आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या तसेच दिंडोरी मतदारसंघातील भगरे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या संपत्तीची तुलना करता भगरे हे खरोखर सामान्य व्यक्ती ठरतात.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सध्याच्या झगमगटाच्या राजकीय ट्रेंडमध्ये एका सामान्य नागरिकाला उमेदवार म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे भगरे यांचे मतदारसंघातदेखील स्वागत होत आहे. अनेक नागरिक, कार्यकर्ते त्यांच्यासाठी देणग्या जमा करून त्यांना मदत करीत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT