Dindori Lok Sabha Constituency : भगरेंना सप्तशृंगी देवी पावली; मतदारांनी देणग्या देऊन केले राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे स्वागत!

NCP Sharadchandra Pawar Party News : कार्यकर्त्यांनी परिसरातील प्रश्न मांडून यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मागे उभे राहण्याचा निर्धार केला. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी भगरे यांना उस्फूर्तपणे देणग्या जाहीर करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता दहा ते बारा लाख रुपयांच्या देणग्या संकलित झाल्या.
Bhaskarrao Bhagare-Sharad Pawar
Bhaskarrao Bhagare-Sharad PawarSarkarnama

Nashik, 31 March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिंडोरीत एक सर्वसामान्य कार्यकर्ते भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भगरे यांनी आज (ता. 31 मार्च) वणी येथील श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या या कार्यक्रमाला सर्वसामान्य मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भास्करराव भगरे (Bhaskarrao Bhagare) यांनी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ पिंगळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह आज वणी येथे सप्तशृंगी देवी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा कार्यक्रम ठरला होता. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र, भगरे राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसह मंदिरात दर्शनासाठी आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे फक्त नारळ वाढविण्याच्या या कार्यक्रमात नेते आणि कार्यकर्त्यांनी उमेदवार भगरे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाषणे देण्यास सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhaskarrao Bhagare-Sharad Pawar
Solapur Loksabha Constituency : प्रणिती शिंदेंचे आरोप शहिदांचे अपमान करणारे; राम सातपुते यांचे प्रत्युत्तर

यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरातील प्रश्न मांडून यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar) मागे उभे राहण्याचा निर्धार केला. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी भगरे यांना उस्फूर्तपणे देणग्या जाहीर करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता दहा ते बारा लाख रुपयांच्या देणग्या संकलित झाल्या. मतदारांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने भगरे यांनाही सुखद आश्चर्य वाटले.

कार्यकर्ते देखील या उमेदवाराच्या मागे मनापासून उभे राहतील, असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे उमेदवार भगरे भावूक झाले, त्यांचा कंठ दाटून आला, त्याच दाटलेल्या कंठाने त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

श्रीराम शेटे यांनी प्रामाणिकपणे एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी दिली आहे. मतदारसंघाचे प्रश्न ते निश्चितपणे सोडवतील. शेतकरी आणि कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी ते संघर्ष करतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी गोकुळ पिंगळे, तिलोत्तमा पाटील, दत्तात्रेय पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, प्रभाकर जाधव, अंबादास गांगुर्डे, शिवाजी निरगुडे, काँग्रेसचे प्रकाश पिंगळ, अनवट महाराज यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Bhaskarrao Bhagare-Sharad Pawar
Dilip Mane Join Congress : माजी आमदार माने 5 वर्षांनंतर स्वगृही परतले; प्रणिती शिंदेंना मिळणार मोठे पाठबळ!

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency ) भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव भगरे यांना उमेदवारी दिली आहे. भगरे यांना शनिवारी (ता. ३० मार्च) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे पक्ष कार्यकर्त्यांनी स्वागत केले. आता दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भगरे यांच्यात लढत होणार आहे.

या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीवरून चांगलेच धमासान सुरू होते, त्यात आता उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे, तरीही अन्य इच्छूक नाराज आहेत, या परिस्थितीत ही निवडणूक चांगलीच रंगण्याची चिन्हे आहेत.

Bhaskarrao Bhagare-Sharad Pawar
Danve Meet Khaire : अंबादास दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवला अन् संशयाचे धुके दूर केले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com