Lok Sabha Election 2024  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'मी लढणार अन् ठाकरेंच्या उमेदवाराला नडणार'; ठाकरेंची डोकेदुखी वाढली, बंडखोरी उफाळली...

Udhhav Thackeray News : प्रत्येक वेळी पक्षाकडून आपल्यावर अन्याय झाला आहे. उमेदवारी न मिळाल्याने आपले समर्थकदेखील नाराज आहेत.

Sampat Devgire

Nashik News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज नाशिक लोकसभा मतदारसंघासठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ठाकरे गटाकडूनच इच्छुक असलेले विजय करंजकर आता चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पक्ष नेत्यांबाबत संताप व्यक्त केला आहे. आता करंजकर यांची नाराजी बंडखोरीत उमटू शकते, असे संकेत मिळत आहेत. (Latest Marathi News)

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघप्रमुख विजय करंजकर यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. उमेदवारीच्या अपेक्षेने गेले काही दिवस आपण मतदारसंघात प्रचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी गेले दोन टर्म लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होतो. मात्र, प्रत्येक वेळी पक्षाकडून आपल्यावर अन्याय झाला आहे. उमेदवारी न मिळाल्याने आपले समर्थकदेखील नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केल्याचे करंजकर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाल्यावर करंजकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पक्षाच्या नेत्यांनी योग्य निर्णय घेतलेला नाही. पक्षामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पक्ष अतिशय घातकी निर्णय घेत आहेत. ते पक्षासाठी चांगले नाहीत. याबाबत सातत्याने विविध करत पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत.

यावेळेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते. निवडणूक प्रचाराला लागण्याच्या सूचनादेखील केल्या होत्या. त्यामुळे आपण मतदारसंघात संपर्क मोहीम हाती घेतली होती. आज उमेदवारी जाहीर झाल्याने आपले समर्थक व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत आपण शिवसेनेचे (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत त्यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने करंजकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे टाळले. आगामी निवडणुकीत मी बराच पुढे गेलेलो असल्याने मी निवडणूक लढणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला नडणार आहे, असा इशारा देत करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) नाशिकचा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडला आहे. मात्र, उमेदवाराचा निर्णय त्यांनी विविध पर्याय डोळे पुढे ठेवून घेतलेला आहे. प्रारंभी करंजकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्व्हेमध्ये करंजकर यांच्यापेक्षा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने मतदारांचा कौल मिळाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी याबाबत विशेष लक्ष घातले होते. विविध पदाधिकारी आणि सहकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर वाजे यांना पसंती मिळाल्याचे बोलले जाते. वाजे यांनी मात्र पक्षाकडे स्वतःहून उमेदवारी मागितलेली नव्हती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाल्यावर करंजकर यांनी बंडखोरीची संकेत दिले आहेत. त्यात कितपत तथ्य आहे आणि ते खरोखर बंडखोरी करतील का हा उत्सुकतेचा विषय आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT