Hemant Godase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha election 2024: शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीचा फेरविचार?

Hemant Godse News : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला जय महाराष्ट्र केल्याचा पश्चाताप खासदार हेमंत गोडसे यांना करावा लागण्याचे संकेत मिळत आहेत.

संपत देवगिरे : सकाळ वृत्तसेवा

Hemant Godse News : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला जय महाराष्ट्र केल्याचा पश्चाताप खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना करावा लागण्याचे संकेत मिळत आहेत. कारण महायुतीच्या घटक पक्षांच्या दबावामुळे शिवसेना शिंदे गट गोडसे यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. खासदार गोडसे यांच्या नाशिक मतदारसंघातील उमेदवारीला गेले काही दिवस सतत विरोध केला जात होता. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत मौन बाळगले होते. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष भाजप विरोधासाठी सर्वात पुढे होता, तर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी सूचक विधाने केले होते. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.

शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाच्या राज्यातील सर्व तेरा खासदारांना काल मुंबईत (Mumbai) बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. या बैठकीत उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक खासदाराशी संवाद करण्यात आला. यामध्ये शिंदे गटासाठी किती जागा सोडल्या जाणार? हा वाददेखील पुढे आला. त्यानंतर काही खासदारांना तूर्त शांत राहण्याचा सल्ला दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचादेखील समावेश असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा प्रवेश झाला आहे. आधीच अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजप असे सहकारी पक्ष होते. आता या चार पक्षांमध्ये जागावाटपांवरून प्रचंड वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधी उमेदवारांनी कोणत्या चिन्हावर लढावे याबबतच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता शिंदे गटाच्या जागांवर राज ठाकरे यांनी दावा केल्याने महायुतीतील पक्ष तणावात आले आहेत. या तणावामुळे काही विद्यमान खासदारांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या हे खासदारदेखील पुढील राजकीय वाटचालीबाबत आत्मचिंतन करू लागल्याचे बोलले जाते.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या (Nashik) काही पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांच्यासाठी पर्याय उमेदवाराचा शोध सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यासाठी ते अन्य पक्षातील उमेदवारांशीदेखील संवाद साधत आहेत. याबाबत एक तातडीचा सर्व्हेेखील केला जाणार आहे. हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांसाठी ही धक्कादायक बाब असून, त्याचा नाशिक लोकसभेच्या मतदारसंघावर राजकीय परिणाम होऊ शकतो.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT