Dindori Lok Sabha Constituency : महाआघाडीला स्थिती अनुकूल, तगडा उमेदवार द्या; सहकारी पक्षांनी टोचले राष्ट्रवादीचे कान!

Mahavikas Aghadi News : उमेदवारीचे भिजत घोंगडे हा सहकारी पक्षांनादेखील चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात 'सीपीएम'चे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कान टोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमचा विचार करत नाही. किमान त्यांनी प्रबळ उमेदवार तरी दिला पाहिजे.
Sharad Pawar-J. P. Gavit
Sharad Pawar-J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 22 March : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अद्याप प्रभावी उमेदवार मिळालेला नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरूच आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांसह सहकारी पक्षांनीही राष्ट्रवादीचे कान टोचले आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency ) भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून झालेल्या प्रचारामुळे या मतदारसंघात अनुकूल वातावरण असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) प्रबळ उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही. सध्या येथे भास्करराव भगरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ते फारसे परिचित नाहीत. त्यामुळे प्रभावी उमेदवार असावा, असा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडीचे गाडे उमेदवाराच्या शोधामुळे अडले आहे.

Sharad Pawar-J. P. Gavit
Solapur Loksabha constituency : सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुते फायनल; दोन युवा आमदारांमध्ये होणार लढत

या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) जे. पी. गावित यांचा पेठ सुरगाणा आणि कळवण या भागात प्रभाव आहे. त्यामुळे एक जागा मिळावी, त्यासाठी दिंडोरी मतदारसंघ सीपीएमला द्यावा, असा या नेत्यांचा आग्रह आहे. मात्र, त्याचा फारसा विचार झालेला नाही. सीपीएम महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवारीचा आग्रह मान्य न झाल्यास काय भूमिका घेणार, हे अद्याप गुलदस्तातच ठेवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही दिंडोरी मतदारसंघातील प्रचार आणि उमेदवारी दोन्ही गोष्टींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चाचपडत असल्याचे चित्र आहे.

दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध घेण्याबाबत विविध स्तरांवरून नेत्यांकडे रोज नवे निरोप जात आहेत. या मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांच्या विरोधात 'सीपीएम'चे जे. पी. गावित यांची लढत व्हावी, असा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणून डॉ. पवार यांच्या कट्टर राजकीय विरोधक आणि सख्या जाऊबाई तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार हा एक पर्याय पुढे येत आहे. चिंतामण गावित यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे.

Sharad Pawar-J. P. Gavit
SanjeevRaje Naik Nimbalkar : माढ्याच्या रणांगणात फलटणचे राजे वाजविणार तुतारी?

उमेदवारीचे भिजत घोंगडे हा सहकारी पक्षांनादेखील चिंतेचा विषय आहे. यासंदर्भात 'सीपीएम'चे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कान टोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमचा विचार करत नाही. किमान त्यांनी प्रबळ उमेदवार तरी दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हे आपले एकमेव उद्दिष्ट आहेत. त्यासाठी स्थानिक व वरिष्ठ नेत्यांनी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि सोय बाजूला ठेवून निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ही एकमेव पात्रता विचारात घेतली पाहिजे. 'सीपीएम'ने गेली पाच वर्षे या मतदारसंघात शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांवर खूप मोठे काम केले आहे. आमचा हक्काचा मतदार आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक प्रभावीपणे लढू शकतो, असा आमचा आत्मविश्वास आहे.

Sharad Pawar-J. P. Gavit
Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर लोकसभेला कागल बाहुबलीच्या भूमिकेत; विधानसभेतील काटे दूर करण्याचा शह-कटशह...

महाविकास आघाडीचे उमेदवार ठरत नसल्याने भाजपच्या डॉ. पवार यांनीही आपले डावपेच उघड केलेले नाहीत. प्रचाराचे सखोल नियोजन आणि भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा हा त्यांचा यूएसपी आहे. त्यामुळे अद्याप तरी डॉ. भारती पवार निश्चिंत दिसतात. मतदारसंघात महाविकास आघाडीने कांदा निर्यात बंदी, तसेच शेतीच्या प्रश्नांवर आंदोलन करून वातावरण अनुकूल केले आहे. त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला घेता येईल की नाही, ही राजकीय अनिश्चितता सध्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकेदुखी ठरत आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Sharad Pawar-J. P. Gavit
Loksabha Election 2024 : कोल्हापूर-करवीर; चेतन नरकेंचे डावपेच वाढविणार महायुती अन् महाविकास आघाडीची डोकेदुखी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com