raj thackeray ajit pawar eknath shinde devendra fadnavis sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मनसेच्या 'बंदरबाट'मुळे महायुतीत अस्वस्थता?

Mns Alliance With Bjp : मनसेचा महायुतीत समावेश झाल्यात जमा आहे. त्यानंतर मनसेला कोणत्या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

Sampat Devgire

Loksabha election 2024 : महायुतीमध्ये मनसेचा ( Mns ) समावेश सहकारी पक्षांना डोकेदुखी ठरू लागला आहे. एकीकडे भाजपचा ( bjp ) जागा मागणीसाठी दबाव आहे. दुसरीकडे मनसेला द्यावयाच्या नेमक्या जागा कोणत्या हे स्पष्ट नाही. या वादात शिवसेनेच्या शिंदे ( Shivsena Shinde Group ) गटाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) (शिर्डी) आणि हेमंत गोडसे ( Hemant Godse ) (नाशिक) या दोन खासदारांनी भाजपला पाठिंबा देत उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला होता. शिंदे गटाच्या ज्या तेरा खासदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात होती. सध्या मात्र महायुतीतील भाजप, अजित पवार गट आणि नव्याने दाखल झालेल्या मनसेकडून जागांच्या अपेक्षांमुळे सर्वाधिक झळ शिंदे गटाला बसेल असे चित्र निर्माण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसेचा महायुतीत समावेश झाल्यात जमा आहे. त्यानंतर मनसेला कोणत्या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि भाजपच्या श्रेष्ठींमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला नाही. त्यामुळे ही उत्सुकता रोज नव्या स्वरूपात पुढे येत आहे. त्यात प्रामुख्याने नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघांची चर्चा होत आहे. या दोन्ही ठिकाणी शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे या चर्चेने दोन्ही खासदार अस्वस्थ झाले आहेत. या दोन्ही खासदारांनी गुरुवारी तातडीने मुंबईला प्रयाण केले आणि श्रेष्ठींशी चर्चा केली. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही असे कळते.

नाशिक मतदारसंघात भाजपकडून सातत्याने शिंदे गटावर दबाव निर्माण करण्यात आला आहे. नाशिकचा मतदारसंघ मिळविण्यासाठी रोज नवे राजकीय डावपेच आखले जात आहेत. त्यातून आता थेट शिंदे गटाच्या राजकीय ताकदीवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. शिंदे गट पुरेसा सक्षम नाही, असा दावा भाजपच्या इच्छुकांनी केला आहे. यातून महायुतीतील घटक पक्ष एकमेकांना मदत करणार की नाही, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या आरोपांचा रोख स्वबळावर निवडणूक लढविण्यासारखा आहे. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि अन्य नेत्यांकडे अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातून महायुतीमधील पक्षांतील दुरावा वाढत असल्याचे दिसते.

शिर्डी मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप हेदेखील इच्छुक आहेत. उमेदवारीच्या वादातूनच त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. ते शिंदे गटाकडून शिर्डी मतदारसंघातून उमेदवार असतील, असा अंदाज आहे. ही सर्व राजकीय समीकरणे मनसेच्या महायुतीतील प्रवेशाने बिघडली आहेत. मनसेला एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक या जागांचा उल्लेख केला जातोय. या तीनही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. यातून मनसेचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला एका जागेची तडजोड करायला लावतील, असे दिसते. चर्चा मात्र नाशिक आणि शिर्डीची अधिक होत आहे. त्यामुळे शिंदे गटावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये महायुतीतील एकोप्याची भावना कमी होते की काय, अशी चिन्हे आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT