Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : काळे ना कोल्हे; आता फक्त ठाकरे सेनेचा वाघ ! राऊतांनी डिवचलं...

Pradeep Pendhare

Nagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज कोपरगाव येथे सभा झाली. या सभेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. आता काळे ना कोल्हे, कोपरगावात फक्तं सेनेचा वाघच निवडून येणार, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी काळे - कोल्हेंना डिवचले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा सुरू असून त्यांच्या कालपासून सात ठिकाणी सभा झाल्या असून त्यांनी जनतेशी संवाद साधला. कोपरगावात संवाद मेळाव्यातून खासदार संजय राऊत यांनी काळे आणि कोल्हे यांच्यावर थेट हल्ला चढविला. यावेळी उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे, काँग्रेसचे आकाश नागरे, सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत म्हणाले, "सध्या कोपरगावात आठ दिवसाआड पाणी येतं, तेही गढूळ! एवढे मोठमोठे सम्राट, राज्यकर्ते पण जनतेला प्यायला पाणी देऊ शकत नसेल तर काय उपयोग? पण आता उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि महाराष्ट्रात आता परिवर्तन घडणार असून त्यासाठी कोपरगाव देखील आघाडीवर असेल". महाराष्ट्रात सध्या चित्र खराब होत चाललंय, चोर, लफंगे दरोडेखोर यांचं राज्य येथे चालू आहे. अशा शब्दात राज्यातील महायुती सरकारवर खासदार राऊत यांनी टीका केली.

आमदार काळेंना करुन दिली आठवण...

संजय राऊतांनी कोपरगावात गढूळ पाण्यापासून तळ्याच्या निधीपर्यंत सर्वच काढले. स्थानिक नेत्यांना टार्गेट केले आहे. सध्या कोपरगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू आहे. त्या तलावासाठी महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 131 कोटी रुपयांचा निधी दिला. आमदार आशुतोष काळे यांना त्या निधीची आठवण राऊतांनी करून दिली.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT