Dada Bhuse News : 'संजय राऊत काय गणपत गायकवाडांकडे हिशोब घ्यायला गेले होते?' ; दादा भुसेंचा खोचक सवाल!

Sanjay Raut demands arrest of CM Shinde : मुख्यमंत्र्यांना EDने अटक करावी, अशी मागणी संजय राऊतांकडून केली जात आहे.
Dada Bhuse- Sanjay Raut
Dada Bhuse- Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. राऊत काय गणपत गायकवाडांकडे हिशोब घ्यायला गेले होते काय? असा प्रश्न उपस्थित करीत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर आगपाखड केली. गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांच्याकडून करण्यात येते आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हानगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या चालवल्या. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. तसेच त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटले. त्यातच गोळीबाराच्या घटनेनंतर गायकवाड यांनी मीडियाशी बोलताना थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट करताना मी आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंना कोट्यवधी रूपये दिल्याचा आरोपही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dada Bhuse- Sanjay Raut
Congress and EVM : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'EVM'बाबत काँग्रेसने उचलले 'हे' पाऊल!

या आरोपाच्या आधारेच संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांकडे मोर्चा वळवला आहे. मुख्यमंत्र्यांना कोट्यवधी रूपये दिले या आरोप तथ्य आहे की नाही हे शोधण्यासाठी EDने मुख्यमंत्र्यांना अटक करावी, अशी मागणी राऊत सातत्याने करीत आहेत. विरोधकांवर असे आरोप झाल्यानंतरच ED सक्रीय झाली आणि अनेकांना अटक करण्यात आल्याकडे राऊतांनी लक्ष वेधले.

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या पालकमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांना विचारले असता त्यांनी राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नसल्याची टीका केली. तसेच राऊत काय गणपत गायकवाड यांच्याकडे हिशोब घ्यायला गेले होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत या विषयावर भाष्य करणे टाळले.

Dada Bhuse- Sanjay Raut
Malegaon Tender Scam : एमआयएम आमदाराचे टेंडरसंदर्भात ‘ते’ वाक्य अन्‌ विरोधकांसह मित्रपक्षही तुटून पडले

सगळे एकाच माळेचे मणी नाहीत -

हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणे(Nitesh Rane) यांनी संयम राखावा, असा सल्ला दादा भुसे यांनी दिला. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणून हिणवले होते. या पार्श्वभूमीवर मालेगावाचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी आमदार आसिफ शेख यांनी राणेंना नोटीस पाठवली आहे. माफी मागा अन्यथा फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा शेख यांनी दिला. यावर बोलताना दादा भुसे म्हणाले की प्रत्येक समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे लोक असतात. त्यामुळे सगळ्यांना वाईट समजून टीका करणे चुकीचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com