bhausaheb kamble bhausaheb wakchaure  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Lok Sabha Election 2024 : ठाकरेंची कांबळेंनी साथ सोडली, शिर्डीत भाऊसाहेब-भाऊसाहेब लढतीची शक्यता

Bhausaheb Kamble Join Shinde Group : भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात 'वर्षा' प्रवेश केला.

Pradeep Pendhare

नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिर्डीत जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ( Bhausaheb Kamble ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची साथ सोडली आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात गुरुवारी ( 21 मार्च ) रात्री उशिरा प्रवेश केला. शिर्डीत विद्यमान शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना विरोध होत होता. त्यामुळे आता शिर्डीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात लोकसभेची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा 2019 मध्ये काँग्रेसचा हात सोडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ( Bhausaheb Kamble ) यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेत ठाकरे यांनी कांबळे यांना, तर काँग्रेसने लहू कानडे यांना तिकीट दिले होते. कानडे यांनी कांबळे यांना पराभवाची धूळ चारली. कांबळे हे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतच होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतरदेखील ते ठाकरे यांच्याबरोबर राहिले. लोकसभा निवडणुकीसाठी ते ( Lok Sabha Election 2024 ) देखील इच्छुक होते. तसा त्यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ( Bhausaheb Wakchaure ) यांनी उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले. यातून माजी आमदार कांबळे काहीसे नाराज होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) दोन टर्म खासदार होते. परंतु, त्यांना मतदारसंघात संपर्क ठेवला नाही. यातून मतदार नाराज आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटातीलच कार्यकर्ते खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध करत होते. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मतदारसंघात जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात केली. यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे त्यांच्या गळाला लागले. शिर्डीतील उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर आहे. त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांना मंत्री विखे कशी मदत करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. मगच शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीला आमदारकीचा शब्द घेतल्याचे भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. परंतु, लोकसभेलाच भाऊसाहेब वाकचौरे आणि भाऊसाहेब कांबळे यांच्यात लढत पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT