Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse News : हेमंत गोडसे म्हणतात, 'मी शिवसेनेचा उमेदवार मला मतदान करा'

Nashik Constituency 2024 : शिंदे गटाची उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र त्याआधीच गोडसेंचे समर्थक करत आहेत गावोगावी प्रचार. हा प्रचार महायुतीच्या अन्य पक्षांनादेखील कितपत पचनी पडतो आणि त्याचे काय राजकीय परिणाम होतात याची उत्सुकता आहे.

Sampat Devgire

Lok Sabha Election News : नाशिक मतदारसंघात महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांत गोंधळ आहे. मात्र उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांनी गावोगावी पत्रके वाटून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे हा प्रचार चर्चेचा विषय आहे.

सध्या नाशिक शहरात अनेक नागरिकांना खासदार गोडसे यांचे रेकॉर्डेड व्हॉईस कॉल येत आहेत. यामध्ये महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे बोलत आहे. माझी निशाणी धनुष्यबाण आहे. अशा प्रकारचे लांबलचक संवाद ऐकायला मिळतात. आतापर्यंत अनेकांना असे मेसेज आले आहेत.

अगदी यामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि उमेदवारांचादेखील समावेश आहे. या कॉलमुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम आहे. युतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. ही जागा कोणाला सुटणार यावरदेखील प्रचंड स्पर्धा आहे. अशा स्थितीत गोडसे यांचा प्रचार सुरू कसा असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

हेमंत गोडसे यांना दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही घोषणा झाली. त्याच्या प्रतिक्रिया महायुतीच्या अन्य पक्षात उमटल्या भारतीय जनता पक्षाने नाशिक मतदारसंघ आपल्यालाच मिळावा म्हणून जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने NCP Ajit Pawar Group ही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यासाठी हा मतदारसंघ मागितला होता. त्यामुळे मतदारसंघ कोणाला या वादात जवळपास दोन आठवडे निघून गेले आहेत. मात्र, अद्यापही निर्णय झालेला नाही.

नाशिक मतदारसंघ महायुतीतील कोणत्या घटक पक्षाला मिळणार याचा निर्णय निश्चित नाही. मात्र, शिवसेनेच्या Shivsena शिंदे गटाला येथे विद्यमान खासदार असल्यामुळे हा मतदारसंघ मिळेल असा विश्वास आहे. त्यामुळे खासदार गोडसे यांनी पत्रके छापून वितरित करण्यास सुरुवात केली.

महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या आणि पक्षाचे कार्यकर्ते शहरात तसेच इगतपुरी तालुक्यात असा प्रचार करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच आणि ती निश्चित नसताना प्रचार करणारे खासदार गोडसे एकमेव असावे.

सध्या गोडसे समर्थक उमेदवारी केव्हा जाहीर होते या प्रतीक्षेत आहेत. खासदार गोडसे यांनी सहा महिन्यांपूर्वीच आपल्याला उमेदवारी मिळेल असा कयास बांधला होता. त्यामुळे त्यांनी समाज माध्यमांवरील निवडणूक प्रचार मोहीम राबविली आहे.

अन्य तयारीदेखील त्यांनी केलेली आहे, त्यामुळे ते प्रचारक आघाडी घेतील, असे वाटत होते. परंतु उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांचा हा सर्व प्रयत्न प्रत्यक्षात आला नव्हता. आता मात्र त्यांचे समर्थक थांबण्यास तयार नाही, असे दिसते. गावोगावी जाऊन पत्रके वाटपावर त्यांचा भर आहे. त्यामुळे हा प्रचार महायुतीच्या अन्य पक्षांनादेखील कितपत पचनी पडतो आणि त्याचे काय राजकीय परिणाम होतात याची उत्सुकता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT