Shani Shingnapur Devasthan scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shani Shingnapur Scam: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय; अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली 'ही' जबाबदारी

Shri Shanaishwar Devasthan Trust : काही दिवसांपूर्वी श्री शनैश्वर देवस्थानमध्ये व्यवहारांत अनियमितता आढळून आली होती. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांसह नोकर भरती घोटाळा अन् आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूकप्रकरणी चौकशीचा फेरा सुरू आहे

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्य सरकारनं सोमवारी (ता.22) शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं शनैश्वर देवस्थान बरखास्त केलं आहे. आता विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. श्री शनैश्वर देवस्थानच्या प्रशासक म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी श्री शनैश्वर देवस्थानमध्ये व्यवहारांत अनियमितता आढळून आली होती. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांसह नोकर भरती घोटाळा अन् आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूकप्रकरणी चौकशीचा फेरा सुरू आहे. बनावट भ्रमणध्वनी अॅप्स तयार करून आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा विधिमंडळात चांगलाच गाजला होता. याशिवाय बनावट अ‍ॅपद्वारे भाविकांची लूटप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नी देवस्थानमधील भ्रष्टाचाराची भयावह परिस्थितीवर भाष्य करत गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले होते.

विधिमंडळातील या राजकीय गरमागरमीनंतर आता शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात 'शनैश्वर देवस्थान'च्या भाविकांची बनावट अ‍ॅपद्वारे लूट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच बनावट अ‍ॅपच्या लिंक पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सापडल्या असून, त्याच्या चालक-मालक आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अहिल्यानगरमधील सायबर पोलिस ठाण्यात शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी देवस्थानची व भाविकांची बनावट दर्शन अ‍ॅपद्वारे फसवणूक होत असल्याची तक्रार चार जून दिली होती. अशीच तक्रार आणखी दोघांनी देखील दिली होती. सायबर पोलिसांकडून या अर्जांची तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी केली. यात तथ्य आढळले. यानुसार शनैश्वर देवस्थानला संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

सायबर पोलिसांनी फिर्याद दाखल करण्याची सूचना केली, तरी देवस्थान प्रशासनाकडून फिर्याद देण्यात आली नाही. भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याने हे प्रकरण संवेदनशील असल्याचे लक्षात घेऊन भाविकांची अन् संस्थानची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT