
Nilesh Lanke Vs Radhakrishna Vikhe : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा करातील द्विस्तरीय दररचना लागू केल्याची घोषणा केली. अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे, 'बचत उत्सव' असून त्यामध्ये देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन पीएम मोदींनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पीएम मोदींच्या या 'बचत उत्सवा'वर जोरदार हल्ला चढवला होता. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खासदार कोल्हेंना संसदेत बसण्याचा सल्ला देताच, त्यावर खासदार नीलेश लंकेंनी खोचक प्रत्युत्तर दिले.
भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलेल्या सल्ल्यावर खासदार नीलेश लंके म्हणाले, "फुकट सल्ला देणाऱ्यांपेक्षा कामाला अधिक महत्त्व देणारी आम्ही माणसं आहोत." संसदेत कोण किती वेळ बसतं, कोण किती वेळ बाजू लावून धरतं, अमोल कोल्हे यांच्या विषयी बोलायचं झाल्यास अतिशय प्रभावीपणे मांडणी करणारा हा आमचा संसदेमधील नेता आहे. प्रत्येक गोष्टीची मांडणी ही त्यांची अभ्यासपूर्णच असते, अशा गोष्टी त्यांना सांगणे योग्य नाही, असे खासदार लंके यांनी म्हटले.
आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे. यावर खासदार लंकेंनी, ते बरोबरच आहे असे म्हटले. तसंच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हायचं आहे. यावर खासदार लंकेंनी हा त्यांचा पक्षाचा विषय आहे, आम्ही त्यावर सल्ला देणं योग्य नाही, असे सांगून त्यावर अधिक प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.
राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या मुद्यावर खासदार लंके म्हणाले, "वोट चोरी तर, महाभयंकर मुद्दा आहे. राहुल गांधी साहेबांनी तो अतिशय काळजीपूर्वक देशासमोर मांडला आहे. वोट चोरी हे देशासाठी घातकच आहे." आतापर्यंत तुम्ही जीएसटी घेतलंच आहे. मग बचत उत्सव कसला? असा टोला खासदार लंकेंनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी बचत उत्सवाला काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, "प्रत्येक जण आपलं मत मांडत असतो, अमोल कोल्हेंना एवढीच विनंती आहे की, थोडं संसदेमध्ये जास्त वेळ बसत जा, त्यांना सरकारची भूमिका काय आहे ते कळेल!"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.