Uddhav Thackeray & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी करणार सर्व्हेक्षण!

Maharashtra Politics, NCP will prepare survey for Loksabha election-महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला येत्या १९ डिसेंबर नंतर गती येण्याची शक्यता.

Sampat Devgire

Nashik Loksabha election : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी राजकीय सर्व्हेक्षण करून येत्या २० डिसेंबरपर्यंत माहिती देण्याच्या सूचना दिल्या. (NCP Office Bearers claim that, they have positive Political response)

नाशिक (Nashik) आणि दिंडोरी हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे असतील याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सध्या निवडणुकीसाठी येथे चाचपणी करीत आहे. यामध्ये शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन्ही पक्षात उमेदवार इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग यांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे कळते. याबाबत नाशिक आणि दिंडोरी हे दोन्ही मतदारसंघ मराठा बहुल मतदारांचे वर्चस्व असलेले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात यापूर्वी देविदास पिंगळे आणि समीर भुजबळ निवडून आले आहेत. मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल तयार करणार असल्याची माहिती गोकुळ पिंगळे यांनी दिली.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, दिलीप बनकर, नरहरी झिरवळ आणि नितीन पवार हे आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने तेथील राजकीय स्थिती पक्षाला अनुकूल असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

आमदार अजित पवार यांच्या गटात गेले असले तरीही त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मात्र शरीराने अजित पवार तर मनाने शरद पवार यांच्यासोबत आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये शिवसेनेचे देखील येवला, निफाड, चांदवड आणि दिंडोरी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले वर्चस्व आहे. अशा स्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला अनुकूल आहे. त्याचा लाभ कसा घ्यावा, याबाबत पदाधिकारी अभ्यास करीत आहेत. त्यासाठी येत्या २० डिसेंबरला सर्वेक्षण अहवाल पवार यांना सादर करण्यात येईल.

इंडिया आघाडीची बैठक येथे १९ डिसेंबरला नवी दिल्लीत येथे होणार आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा आणि धोरण ठरेल. त्यानंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष जागा वाटपाचा निर्णय घेतील. त्यामुळे पवार यांच्या दौऱ्याने निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झाली असे म्हणता येईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT