Maharashtra Politics : संसदेतील घटनेवरून दानवे आणि सभापतींमध्ये खडाजंगी!

Maharashtra Politics, Ambadas Danve aggressive on Loksabha issue-संसदेत प्रेक्षागृहातून युवकांनी उडी मारल्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेत उमटले
Loksabha
Loksabha Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly session 2023: लोकसभेच्या सभागृहात दोन युवकांनी प्रेक्षागृहातून उड्या मारल्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यांत चागंलीच खडाजंगी झाली. (leader of Opposition Ambadas Danve raised issue on Loksabha incidence)

आज लोकसभेच्या सभागृहात दोन युवकांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी उड्या मारल्या. हा विषय उपस्थित करण्यावरून शिवसेनेचे (Shivsena) अंबादास दानवे (Amabadas Danve) आणि सभापती नीलमताई गोऱ्हे (Neelamtai Gorhe) यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर गोंधळ झाला.

Loksabha
Shivsena Politics : एकदा नागपूर आणि पुण्याचीही चौकशी कराल का?

विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर लक्षवेधी सुचनांवर चर्चा सुरू होणार होती. यावेळी सभापतींनी लोकसभेच्या प्रेक्षागृहातून दोन युवकांनी सभागृहात उड्या मारल्या आहेत. त्यामुळे आपण देखील याबाबत काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही सदस्यांनी विधान परिषदेच्या गॅलरीसाठी पासेस देण्याची शिफारस करू नये, असे सांगितले. त्यानंतर त्या पुढील कामकाजाकडे वळल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादजास दानवे सभागृहात उपस्थित नव्हते.

त्यानंतर काही वेळातच दानवे सभागृहात आले. त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेत घडलेल्या घटनेची माहिती ेदण्यास सुरवात केली. यावेळी सभापतींनी तुम्ही सभागृहात नव्हता. तेव्हा मी ही माहिती दिली आहे, असे सांगत त्यांना थांबवण्याचा प्रय्तन केला. त्यावरून दानवे आणि सभापतींत खडाजंगी झाली. दानवे यांनी तुम्ही सांगितले, म्हणजे सर्व झाले का?. आम्ही काहीच बोलायचे नाही का?. असे सांगित बोलत राहिल्याने गोंधळ सुरू झाला.

त्यानंतर दानवे म्हणाले, ते देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. त्याबाबत सरकारने खुलासा केला पाहिजे. सरकार याबाबत गंभीर आहे का?. त्यात काय नेमके घडले आहे. आपण काय खबरदारी घेणार आहोत, हा माझा प्रश्न आहे. त्यासाठीच मी पॉईंट ऑफ इन्फर्मेशन आहे. सभापतीनी सांगतिले, तरीही आम्ही देखील बोलले पाहिजे.

त्यावर सभापतींनी काय अधिकृत माहिती मी देते आहे. जेव्हा त्याची अधिकृत माहिती मिळेल, तेव्हा मी ती सभागृहाला माहिती देईन. आपण तेव्हा सभागृहात नव्हता. त्यात मी काय करणार ?. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यच परस्परांत बोलू लागल्याने गोंधळ झाला.

Loksabha
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

त्यावर अनिल परब यांनी देखील त्यात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीत, हा सिक्युरीटीचा प्रश्न आहे. इथे सभागृहाबाहेर अक्षरश: जत्रा भरलेली आहे. त्यातील कोणी सभागृहात वरती आला तर काय?. घटनेचे गांभिर्य आहे की नाही, असा प्रश्न केला. त्यावर सभापतींनी टीअर गॅसची माहिती मलाही मिळाली होती. मात्र गोंधळ होऊ नये, त्यामुळे ती न सागंण्याची परिपक्वता असते. मग काय आपण लाईव्ह बघत बसायचे काय?. सरकारने त्याची दखल घेतली आहे, असे सांगत त्यांनी मंत्री सामंत यांना सरकारच्या वतीने माहिती देण्याची सुचना केली. त्यानंतर गोंधळ वाढला.

मंत्री सामंत यांनी लोकसभेत काय घडले, त्याबाबत सरकारने दखल घेतली आहे. घटनेबाबत लोकसभा अधिकृत माहिती देईल. त्या प्रश्नावरून उगीच राजकारण करू नये. सर्वांची सुरक्षा बघण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे, असे सांगितले.

Loksabha
Parliament Attack 2001 : संसदेत २२ वर्षांपूर्वी काय घडले होते ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com