Nashik NCP News : शरद पवारांचा वाढदिवस अन् इच्छुकांचा 'मौके पे चौका'

Willing Candidates for Election celebrate NCP leader Sharad Pawar`s Birthday-वाढदिवसाला शरद पवार पहिल्यांदाच नाशिकमध्ये असल्याने इच्छुकांमध्ये उत्साह
Adv. Bhagirath Shinde, Sharad Pawar & Dr. Zakir Shaikh
Adv. Bhagirath Shinde, Sharad Pawar & Dr. Zakir ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या वाढदिवसाला नाशिक मध्ये होते. या संधीचा लाभ घेत अनेक इच्छुकांनी त्यांना शुभेच्छा देत, त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यामुळे पवार यांचा वाढदिवस आणि इच्छुकांचा उत्साह दोन्हीही चर्चेत आहेत. (Big Crowd of Sharad Pawar Followers as well party workers for Birthday)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस नाशिक (Nashik) शहरात साजरा झाला. यावेळी शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढवून गेला.

Adv. Bhagirath Shinde, Sharad Pawar & Dr. Zakir Shaikh
Maharashtra Politics : संसदेतील घटनेवरून दानवे आणि सभापतींमध्ये खडाजंगी!

ज्येष्ठ नेते पवार यांचा काल ८३ वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ते शेतकरी आंदोलनासाठी नाशिकला आले होते. वाढदिवसाच्या दिवशी ते नाशिकहून विशेष विमानाने नागपूरला रवाना झाले.

या दौऱ्यात पवार यांनी कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावर आंदोलन करून जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापवले. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाला पवारांचा हा दौरा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. या दृष्टीने भाजपचे नेते चिंतेत आहेत.

श्री. पवार महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यादृष्टीने शिवसेना व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अर्थातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची संदर्भ होता. त्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी पवार यांना नाशिकचा दौरा करण्याची विनंती केली. विशेष: शिवसेनेच्या दृष्टीने विधानसभा आणि लोकसभा दोन्हीही निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत हा पक्ष गांभिर्याने तयारील करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेत्यांची शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. यामध्ये प्रामुख्याने शहरातील इच्छुक उमेदवार देखील होते. जगदीश गोडसे यांनी पवार यांचे स्वागत केले. ते नाशिक पूर्व मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर झाकीर शेख यांनी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी भला मोठा हार आणि केक आणला होता.

यावेळी जेष्ठ नेते भगीरथ शिंदे कोंडाजी मामा आव्हाड गोकुळ पिंगळे यांचं डॉक्टर सुभाष लोहकरे डॉक्टर विक्रम पडोळ डॉक्टर दीपक बागमार डॉक्टर अमोल मुरकुटे प्रशांत शेटे नरेंद्र पाटील नरसिंग माने एडवोकेट भास्करराव पवार राजाभाऊ अहिरे कलीम शेख आधी नेत्यांनी पवार यांना शुभेच्छा दिल्या

Adv. Bhagirath Shinde, Sharad Pawar & Dr. Zakir Shaikh
Parliament Attack : संसदेवरील हल्ल्याच्या कटू आठवणींना 22 वर्षे पूर्ण

डॉक्टर शेख यांनी आपण नाशिक मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. वैद्यकीय व्यवसायात असल्याने आपला या भागातील अल्पसंख्यांक तसेच मराठा व अन्य ओबीसी घटकांची मोठा संपर्क असल्याचे सांगितले. एकंदरच पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये अपेक्षांचे घुमारे फुटू लागले आहेत, असे चित्र आहे.

Adv. Bhagirath Shinde, Sharad Pawar & Dr. Zakir Shaikh
Shivsena Politics : एकदा नागपूर आणि पुण्याचीही चौकशी कराल का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com