Shivsena Politics : एकदा नागपूर आणि पुण्याचीही चौकशी कराल का?

Mumbai City Politics, Shivsena leaders criticised Government on Contractor-मुंबईतील रस्ते कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीवरून मंत्री व शिवसेना सदस्यांत आरोप, प्रत्यारोप
Uday Samant & Sachin Ahir
Uday Samant & Sachin AhirSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly session : मुंबई शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत कंत्राटदारांवरील कारवाईच्या प्रश्नावरून आज शिवसेनेचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक घडली. यावेळी शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी मुंबईची चौकशी करता, एकदा नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमहापालिकेची देखील चौकशी करणार का? अशी मागणी केली. (Shivsena MLC Sachin Ahir Deemands Contractor shall be black listed)

मुंबई (Mumbai) महापालिकेच्या रस्त्यांच्या प्रश्नावर आज शिवसेना (Shivsena) आणि सत्ताधारी भाजपच्या (BJP) सदस्यांनी एकमेकांवर चागंलेच ताशेरे ओढले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना सचिन अहीर यांनी अडचणीचे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.

Uday Samant & Sachin Ahir
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या राजीनाम्याचा आरक्षण याचिकेवर परिणाम नाही?

मुंबईतील रस्त्यांची कामे कार्यारंभ आदेश मिळूनही सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांविरूद्ध कारवाई करणेबाबत शिवसेना सदस्य सुनिल शिंदे आणि विलास पोतनीस यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री सामंत यांनी काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांची अनामत जकरून दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली.

त्याबाबत शिंदे यांनी हे कंत्राटदार कोण?, त्यांना काळ्या यादीत का टाकले जात नाही?. बऱ्याचदा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्यावर तेच कंत्राटदार वेगळ्या नावाने पुढे येतात. त्यांनाच मोठी कामे मिळतात. त्यामुळे याबाबत कंत्राटदारांवर ठोस कारवाई करावी, असे सांगितले. त्यावर संबंधीत कंत्राटदार न्यायालयात जातात. त्यामुळे नवी समस्या निर्माण होते, असे मंत्री सामंत म्हणाले.

त्यावर सुनिल शिंदे, अनिल परब, राजहंस सिंह, भाई जगताप, सचिन अहिर यांनी विविध प्रश्न विचारले. त्यात राजहंस यांनी कोणत्या कंत्राटदारांना यापूर्वी काय संरक्षण मिळाले, याची देखील चौकशी व्हावी. त्यावर मंत्र्यांनी गेल्या पंचवीस वर्षातील मुंबई महापालिकेच्या कामांची चौकशी होणार आहे. त्यासाठी श्वेतपत्रिका पुढच्या अधिवेशनात सादर होईल, असे सांगितले.

Uday Samant & Sachin Ahir
Nagpur Winter Session : बुलढाणा रुग्णालयातील घोटाळ्याची नव्यानं चौकशी

त्यावर सचिन अहिर यांनी गेल्या पंचवीस वर्षात वीस वर्षे तुम्हीच मुंबई महापालिकेत सत्तेत मांडीला मांडी लाऊन बसले होते. तुम्ही देखील सत्तेत सहभागी होते, हे विसरात येणार नाही. त्यामुळे फक्त मुंबईच का, एकदा नागपूरचीही चौकशी करा. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची देखील चौकशी कराल का?. मग वाटेल ती चौकशी करा. अगदी एसईबी, नगरविकास विभागाकडील ऑडीट, सीएजी अशा कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा, असे या सदस्यांनी सांगतिले.

Uday Samant & Sachin Ahir
Washim News : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक ठरणार रंगतदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com