Uddhav Thackeray Radhakrishna Vikhe patil sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe patil : 'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं...', राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

Roshan More

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलेल्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. गाण्यातील 'जय भवानी' शब्द हटवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. याला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. निवडणूक आयोगासोबत भाजपवर ठाकरेंनी टीका केली. ही हुकूमशाही कडे वाटचाल सुरु असून आम्ही ते सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आता यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचं मानसिक संतुलन ढासळल आहे. ते बेताल विधान करत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे.' असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

परभणीच्या पाथरी येथे महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियाने मारहाण केली आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखेंनी ( Radhakrishna Vikhe patil) माजी महसूल मंत्र्यांवर सडकून टीका केली. महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणं गरजेचे आहे. आचारसंहितेचा फायदा घेऊन वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडायला सुरुवात केलीये. मात्र मागील महसुलमंत्र्यांनी वाळू माफियांना जो राजाश्रय दिला त्यामुळेच राज्याला हे कीड लागली, असे म्हणत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली.

महायुतीचे उद्या शक्तिप्रदर्शन

लोकसभेसाठी उद्या (सोमवार) नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती राहणार असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांनी नीलेश लंकेंसाठी घेतलेल्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे उद्या मोठे शक्तीप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT