Chhagan-Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : छगन भुजबळांच्या मतदारसंघात पाण्याचे राजकारण पेटले; शेतकऱ्यांनी पालकमंत्री महाजनांना फोन लावून दिला थेट इशारा!

Yeola farmers demand News : शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी तातडीने पाण्याचे आवर्तन न मिळाल्यास आंदोलन हाच पर्याय असल्याचा दावा केला.

Sampat Devgire

Nashik News : टंचाईमुळे पाण्याचा प्रश्न आणि राजकारण तापू आता चांगलेच तापू लागले आहे. उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी शेतकरी सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पाण्याचे राजकारण तापले आहे. अपुरा पाऊस झाल्याने उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळा संपताच शेतीच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. साक्री येथे शेतकरी चार तास रस्त्यावर उतरले. येवल्यात सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी पाण्यासाठी बैठक घेत इशारा दिला.

येवल्यात पिकांना टंचाईचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या मतदारसंघातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी बैठक घेतली. पालखेड धरणाचे आवर्तन तातडीने मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक होते. या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

त्यावेळी बैठकीतूनच शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे पक्षाचे पांडुरंग शेळके यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना फोन लावला. यावेळी शेतकऱ्यांची भावना तीव्र असल्याचे सांगण्यात आले. तातडने पालखेड धरणाचे आवर्तन शेतीसाठी सोडावे, अशी मागणी केली. आवर्तन न सोडल्यास शेतकरी आंदोलन करतील अशा इशारा दिला.

पालकमंत्री महाजन यांनी आगामी 10 डिसेंबरला पालखेड धरणाचे आवर्तन सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र तसे केल्यास मोठा विलंब होईल. त्यामुळे तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावर येत्या दोन दिवसात नाशिकला बैठक घेण्याच्या आश्वासन मंत्र्यांनी दिले.

यावेळी बैठकीत शेतकऱ्यांमध्ये वाद देखील रंगला. शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी तातडीने पाण्याचे आवर्तन न मिळाल्यास आंदोलन हाच पर्याय असल्याचा दावा केला. अन्य शेतकरीही या प्रश्नावर आक्रमक असल्याने छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील पाण्याचे राजकारण तापू लागले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन या संदर्भात काय भूमिका घेता याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT