Chimanrao Patil & Dr. Satish Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Parola APMC Election News: प्रचाराआधीच `राष्ट्रवादी`चे पॅनेलप्रमुख सतीश पाटील मैदानाबाहेर!

APMC Election News: शिवसेना शिंदे गटाचे नेते दिनकर पाटील यांनी महाविकास आघाडीचे डॉ. सतीश पाटील यांचा अर्जच बाद केला.

Sampat Devgire

Parola Election News: पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद झाले. त्याच वेळी त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांचाही अर्ज बाद झाला. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाने निवडणुकीआधीच महाविकास आघाडीच्या नेत्याला बाद केले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. (Shivsena Eknath Shinde group`s leader Dr. Dinkar Patil agressive in APMCelection)

शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचे चिरंजीव डॉ. दिनकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते डॉ. सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये (Mahavikas Aghadi) लढत होत आहे. त्यात भाजपच्या (BJP) १६६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीत १८१९ मतदार आहेत. त्यात गेली अकरा वर्षे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांची सत्ता आहे. यंदा त्यांचे चिरंजीव डॉ. दिनकर पाटील यांनी पॅनेल केला आहे. दिनकर पाटील यांनी सुरवातीलाच डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या गटातून लढण्याचे आव्हान दिले होते. मात्र त्याचवेळी उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेते डॉ. पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांवे अर्ज बाद केल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे.

उमेदवारी अर्जावर गुरूवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली. त्यात बाजार समितीचा निकाल कायम ठेवत जिल्हा उपनिबंधकांनी डॉ. सतीश पाटील यांच्यासह रेखा पाटील यांचाही उमेदवारी अर्ज अवैध ठरविला.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सेवा सहकारी मतदारसंघ व इतर मागासवर्ग अशा दोन गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. दिनकर पाटील यांनी हरकत घेतली होती.

डॉ. सतीश पाटील यांनी अमोल चिमणराव पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या दोन्ही प्रकरणांची गुरुवारी (ता. १३) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी झाली. जिल्हा उपनिबंधकांनी अगोदरचा निर्णय कायम ठेवत, डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरविले. रेखा पाटील यांच्या अर्जावर मधुमती पाटील यांनी हरकत घेतली असता, त्यांचा देखील उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर अमोल पाटील यांच्या विरुद्धचा आक्षेप फेटाळण्यात आला.

याबाबत माजी आमदार डॉ. सतीश पाटील म्हणाले, दबावतंत्राचा वापर करून माझे दोन्ही अर्ज अवैध ठरवले आहेत. पत्नी रेखा पाटील यांचा अर्ज सहायक निबंधकांनी वैध ठरविला असतानाही जिल्हा उपनिबंधकांनी मात्र तो अवैध ठरवला. माझ्याकडे उमेदवार सक्षम असून लोकशाही मार्गाने ही लढाई आम्ही जिंकू. सलग सुट्ट्या असल्यामुळे उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT