Advay Hiray , Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Shetki Sangh : संघाच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला, हिरेंचे 60 वर्षांचे वर्चस्व दादा भुसेंनी आणले संपुष्टात

Malegaon Shetki Sangh Election Shiv Sena Victory : मालेगाव येथील शेतकी संघावर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. हिरे कुटुंबियांचे 60 वर्चस्व शिवसेनेच्या दादा भुसेंनी संपुष्टात आणले.

Ganesh Sonawane

Malegaon Shetki Sangh : मालेगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या (शेतकी संघ) पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत संघावरील हिरे घराण्याचे तब्बल ६० वर्षाचे वर्चस्व संपुष्टात आणले. या निकालामुळे संघाच्या राजकारणात सत्ता परिवर्तन घडले असून हिरे घरण्याला धक्का बसला आहे. तर भुसे गटाने प्रथमच संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सर्व १५ जागा जिंकल्या. शेतकी संघाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला असून मंत्री भुसे यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. युवा नेते अद्वय हिरे समर्थित पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालामुळे संघावरील हिरे कुटुंबीयांची ६० वर्षांची सत्ता हातातून निसटली.

मागील दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर यंदा तब्बल ११ वर्षानी प्रत्यक्ष निवडणूक झाली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर भाजप नते अद्वय हिरे यांच्या जनशक्ती पॅनलकडून 9 जागांवर उमेदवार रिंगणात होते.

संघाच्या एकुण १५ जागांसाठी रविवारी (दि. २१) रोजी मतदान पार पडले. सोमवारी (दि. २२) सटाणा नाका येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी झाली.

विजयी उमेदवार खालील प्रमाणे-

सोसायटी गट : आत्माराम अहिरे, सुभाष गिल, सचिन साळुंके, ईश्वर सिसोदे, दिनकर चव्हाण, आकाश हिरे

वैयक्तिक सभासद गट : मधुकर देवरे, विजय निकम, रविंद्र शेवाळे, मयूर हिरे

महिला राखीव : मंगला भामरे, पुष्पा शिंदे

इतर मागास प्रवर्ग : अनिल निकम

अनुसूचित जाती-जमाती : काळू ठाकरे

विमुक्त जाती-भटक्या जमाती : प्रदीपकुमार पवार

भुसे व कांदेंनी ठोकला तळ

मतदानाच्या दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह नांदगावचे आमदार सुहास कांदे, युवा सेना विस्तारक अविष्कार भुसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात दिवसभर तळ ठोकून होते. मतदारांशी संपर्क, मतदान प्रक्रियेवर लक्ष आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन यावर त्यांनी विशेष भर दिला. दुसरीकडे विरोधी गटाकडून अपेक्षित उत्साह दिसून आला नाही. या विजयामुळे शेतकी संघावर पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली आहे. याउलट या निवडणुकीत भाजप नेते अद्वय हिरे हे मतदानासाठीही उपस्थितीत राहिले नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतीची चर्चा रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT