

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाची धूळ चारली आहे. गोकुळ गिते यांना नरेंद्र दराडे यांच्या पेक्षा १०९ मते जास्त पडली. विशेष म्हणजे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतानाही महायुतीचे मतदार फुटले. त्यांनी अपक्ष गोकुळ गिते यांच्या पारड्यात आपली मते टाकली.
दराडे कुटुंबियांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजप व राष्ट्रवादीची तब्बल २१८ मते या निवडणुकीत फुटली. त्यामुळे आपल्यासोबत महायुतीमधूनच दगाफटका झाल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. तर, दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी देखील संताप व्यक्त केला. आमचा विश्वासघात केला. आमचेच पैसै घेऊन आमच्या लोकांना वाटल्याचं दराडे म्हणाले. यावेळी किशोर दराडेंची जीभ घसरली त्यांनी शिविगाळ केली.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीने एकदम थंड डोक्याने एकनाथ शिंदे यांचा गेम केला आहे. सुरुवातीपासून नाशिकची जागा मिळवण्यासाठी भाजप इच्छुक होतं. मात्र वाटाघाटीत एकनाथ शिंदे यांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करुन ही जागा शिवसेनेकडे कायम ठेवली. शिवसेनेतील इतर इच्छुकांना दाबत शिंदेंनी नरेंद्र दराडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. पण एकनाथ शिंदेंचा शिलेदार या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहाता. भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादी कडे १०७ मतदार होते. तिघांचे मिळून महायुतीच्या उमेदवाराकडे तब्बल ४६६ मतांचे बहुमत असतानाही नरेंद्र दराडे यांना या निवडणुकीत केवळ २४८ मते पडली. या उलट अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना तब्बल ३५७ मते पडली. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादीचे मते फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात भाजपची सर्वाधिक मते फुटल्याची शक्यता आहे.
गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेत आपला प्रचार थांबवला होता. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सारं काही आलबेल असल्याचा भास झाला. पण रात्रीच्या अंधारात काय शिजत होतं याची भनक सुद्धा भाजप व राष्ट्रवादीने दराडेंना लागू दिली नाही. गोकुळ गिते यांनी माघार घेतली असली तरी त्यांच्या समर्थकांकडून छुपा प्रचार सुरु होता. मतदारांपर्यंत योग्य तो संदेश पोहचला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.