Manikrao KoKate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinnar Assembly Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत? ; माणिकराव कोकाटेंसमोर असणार 'हे' आव्हान!

Manikrao KoKate News: सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार समर्थकांची निवडणूक तयारी सुरू झाली आहे.

Sampat Devgire

Manikrao KoKate and Sinnar Assembly Constituency News: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत ठरली आहे. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना ही तिरंगी लढत सोयीची की अडचणीची यावर चर्चा झडू लागल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले. त्यामुळे सिन्नरच्या पारंपारिक राजकारणात नवा ट्विस्ट येणार हे निश्चित आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या कोणाच्या उमेदवारीसाठी खासदार वाजे शब्द खर्च करणार यावर पुढील समीकरणे ठरतील.

सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोकाटे विरुद्ध वाजे हे पारंपारिक समीकरण आहे. वाजे दिल्लीत गेल्याने माणिकराव कोकाटे(Manikrao KoKate) यांच्या विरोधातील एक प्रबळ उमेदवार कमी झाला आहे. बदलत्या राजकारणाचा विचार करता आमदार कोकाटे यांच्यासह सध्या वाजे यांच्यापासून दुरावलेले उदय सांगळे यांची तिसरा उमेदवार म्हणून उमेदवारी निश्चित आहे.

अशा स्थितीत महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा पेच असेल. त्यात या आघाडीचा उमेदवार कोण? यासाठी खासदार वाजे यांचे मत महत्त्वाचा असेल. खासदार वाजे गटाकडे सध्या आमदार कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे, राजेश गडाख, बाळासाहेब वाघ यांचे विविध इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

यातील कोणाला पुढे चाल द्यायची यावर वाजे गटात राजकीय खलबते सुरू आहेत. हा निर्णय सोपा नसल्याने सध्या याबाबत खासदार वाजे यांनी मौन धरले आहे. एकंदरीतच सिन्नर विधानसभा निवडणूक यंदा चुरशीची आणि विविध राजकीय घडामोडींची ठरणार आहे.

आमदार कोकाटे पाचव्यांदा आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत. तसे झाल्यास मंत्रिमंडळात आपल्याला स्थान निश्चित असा त्यांचा दावा आहे. कोकाटे यांचे विरोधक मात्र त्यांना खिंडीत पकडण्याची जोरदार तयारी करण्यात व्यस्त आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT