Maratha Reservation News :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : मराठा आंदोलनात 'या' तीन महिलांच्या कामगिरीची तुफान चर्चा; खुद्द जरांगेंनी घेतली दखल!

Manoj Jarange Patil Protest News : जरांगेंच्या आंदोलनात या महिलांची मोठी भूमिका...

Sampat Devgire

Nasik News : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनात लाखो प्रमाणात मराठा समाजबांधव एकजूट झाला होता. या आंदोलनात महिलांनीही हिरीरीने सहभाग घेतला. यामध्ये नाशिकहून निघालेल्या तीन महिलांचा सहभाग व त्यांचे आंदोलनातील कार्य मात्र विशेष लक्षवेधी ठरले. खुद्द मनोज जरांगे-पाटील यांनी यांच्या कामाची दखल घेतली. (Latest Marathi News)

सकल मराठा समाजातर्फे मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 24 जानेवारीला कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. या कार्यकर्त्यांनी आंदोलन दीर्घकाळ चालवले, मुंबईत ठिय्या देण्याच्या तयारीने व्यवस्था केली होती. चार ट्रक व सहा टेम्पो भरून अन्नधान्य, तेल, डाळी आदींसह विविध साहित्य घेऊन ते रवाना झाले होते. यामध्ये तीन महिलांचा विशेष सहभाग होता.

रोहिणी उखाडे, ॲड. सपना राऊत आणि स्वाती कदम या तीन महिलांनी सुरुवातीलाच एक व्हिडीओ तयार करून नाशिकच्या आंदोलकांमध्ये केवळ आम्ही तीन महिला आहोत, अन्य महिलांनीही घरी बसू नये. त्यांनीदेखील आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. आंदोलनात सहभागी व्हा आणि समाजासाठी आपले योगदान द्या, असे आवाहन करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओला असंख्य लाईक, व्ह्यूज मिळाल्या. अनेकांनी तो शेअर केला. या व्हिडीओमुळे नाशिकमधून विशेषतः ग्रामीण भागातून महिला आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकमधून या महिला पुण्याला गेल्या होत्या. तेथून त्या पायी लोणावळामार्गे नवी मुंबईला गेल्या. एक दिवस आधीच नवी मुंबईला गेल्याने त्यापुढे आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाल्या. या सबंध चार दिवसांमध्ये कोणतीही अडचण आली नाही. या तिघी महिला आणि आंदोलकांना मदत व मार्गदर्शन करीत होत्या. विशेषत: अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे नाशिकच्या अन्य टीमबरोबरच या तीन महिलांचे काम आंदोलनातील सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाले होते. मनोज जरांगे-पाटील यांनीदेखील त्याची दखल घेतली.

याबाबतचे उखाडे म्हणाल्या, "आरक्षणाच्या मागणीवर जरांगे-पाटील यांना पाठिंबा म्हणून नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उपोषण सुरू करण्यात आले. त्यात मी पहिल्या दिवसापासून सहभागी झाले होते. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी मी उपोषण करीत होते. अन्य कार्यक्रमातदेखील सहभागी होत होते. दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनामुळे शासनासह अनेक यंत्रणांनी समाजाची परीक्षा पाहिली. अनेक विरोधक कामाला लागले होते. अनेक जण बुद्धिभेद करीत होते. मात्र शेवटी जरांगे-पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मागणी मान्य झाली, याचे आम्हाला समाधान आहे."

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT