Maratha Reservation : 'सरसकट' मराठा समाजाला आरक्षण नाही; त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण...

Ordinance of Govt : कुणबी नोंदी आणि त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीच्या प्रमुख मागणीचा जीआर मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळाले आहे. अंतरवाली सराटीमधून निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकताच राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केली आहे.

यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठीच्या प्रमुख मागणीचा जीआर मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. त्यानंतर मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला आहे. मात्र हे आरक्षण सरसकट मराठा समाजासाठी मिळालेले नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपले स्पष्टीकरण देत एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

CM Eknath Shinde
Jarange Patil's Mother Reaction : महाराष्ट्रातील मराठ्यांच्या लेकरा-बाळांचं कल्याण झालं; मनोज जरांगेंच्या आईची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्य सरकारकडून सुमारे 57 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सग्या-सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. त्या माध्यमातूनही सरकार मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आणि अहवालानुसार आरक्षण देण्यासाठी कायदेशीर लढाई लढेल आणि आरक्षण देईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ज्या मराठा समाजबांधवाना कुणबीमधून आरक्षण मिळणार नाही, त्या मराठा समाजाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्वतंत्रपणे मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकार लढत राहणार. याशिवाय जोपर्यंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत कुणबी नोंदी न मिळालेल्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या सर्व सवलती देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे मराठा समाजाची जी सरसकट आरक्षणाची मागणी होती, त्यावर या घोषणेनंतर मराठा समाजाकडून एकच जल्लोष करण्यात आला.

मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण दिले

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, मीदेखील एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मराठा समाजाच्या परिस्थितीची जाणीव आहे. मराठा समाज कोणाचे हक्काचे आरक्षण मागत नव्हता, तर आपल्या हक्काचे घेत होता, त्यांची ही मागणी पूर्ण करण्याचा मी शब्द दिला होता आणि मी त्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले आहे.

इतक्या दिवस लाखो मराठा समाजाच्या नोंदी अस्तित्वात असतानाही शोधल्या जात नव्हत्या ते काम आमच्या सरकारने केले आहे. यापुढेही ते काम सुरू राहील, मतांसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, असेही स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

(Edited by Amol Sutar)

R...

CM Eknath Shinde
Ajit Pawar Absent Manoj Jarange Sabha : मनोज जरांगेंच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com