Nashik Mratha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाज नाशिक ते मुंबई 'दिंडी' काढणार!

Maratha Community : नाशिक येथे शंभराहून अधिक दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण मंगळवारी थांबवले

संपत देवगिरे ः सरकारनामा

Nashik News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिक येथे साखळी उपोषण सुरू होते. मंगळवारी 105व्या दिवशी त्याची सांगता झाली. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून यापुढे गावोगावी सभा घेण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

मंगळवारी सकाळी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईत २० जानेवारीला आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिंडीत ग्रामीण भागातील समाज बांधवांना जोडण्याचा निर्धार करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून सीबीएस येथील शिवतीर्थावर नाना बच्छाव त्यांच्या सोबत निलेश ठुबे, विकी गायधनी यांनी साखळी उपोषण केले. मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी साखळी उपोषण थांबविण्याचे आवाहन केले. सामान्य माणसाला मुंबईच्या आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी मराठा जोडो अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याअनुषंगाने मंगळवारी आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी नाना बच्छाव यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, शिवसेनेचे जेष्ठ नेते दत्ता गायकवाड, सुनिल बागुल, दिनकर पाटील, करण गायकर आदींच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले, मुंबईतील आंदोलनात सर्व नेत्यांनी सहभागी व्हावे. मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक जोमाने लढायचा आहे. गावा-गावातून मराठा समाज जोडो अभियान राबवून 20 जानेवारीला मुंबईला कुच करायची. सकल मराठा समाजाची पुढील बैठक 30 डिसेंबरला घेण्याचे ठरले.

यावेळी चंद्रकांत बनकर, नितीन रोटे-पाटील, सागर वाबळे, संजय फडोळ, संदीप हांडगे, रोहिणी उखाडे, ममता शिंदे-पाटील, एकता खैरे, पूजा धुमाळ, प्रफुल्ल वाघ, योगेश नाटकर, रोहिणी दळवी, सुधाकर चांदवडे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्र्वर सुरसे, कैलास खांडबहाले राम खुर्दळ यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT