Rajendra Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajendra Vikhe : राजेंद्र विखेंची पोस्ट चर्चेत; 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...'

Nashik Teacher Vidhan Parishad Constituency Election : भाजप नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डाॅ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. नगर जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात विवेक कोल्हे यांच्यासह टिडीएफचे भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, रणजित बोठे हे शिक्षक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Pradeep Pendhare

Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातून राज्याचे भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डाॅ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. मात्र माघार घेताना त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. विखे यांनी म्हटले, 'शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया... वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था'!

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी भाजप (BJP) नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डाॅ. राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. त्यामुळे नगर जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात विवेक कोल्हे यांच्यासह टिडीएफचे भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, रणजित बोठे शिक्षक नेते निवडणूक रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत 36 उमेदवारांपैकी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. आता निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

या निवडणुकीत विवेक कोल्हे अपक्ष म्हणून मैदानात आहेत. राजेंद्र विखे यांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात नगर जिल्ह्यातून संस्थाचालकांपैकी एक विवेक कोल्हे निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार असून, यात (Shiv Sena) आमदार किशोर दराडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट), संदीप गुळवे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), भागवत गायकवाड (समता पक्ष) यांच्यासह अपक्ष म्हणून अनिल तेजा, आप्पासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरूळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरूडे, रतन चावला, संदीप गुळवे (पाटील), हे निवडणुकीच्या रिंगणात आहे.

नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत यावेळी हाय ड्रामा पाहायला मिळाला. अर्ज भरण्यापासून ते माघारी घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी ड्रामा होता. यात केंद्रबिंदू राहिले आमदार किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे राहिले. विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थांची राज्य सरकारच्या पथकाकडून तपासणी झाली. अर्ज मागे घेण्यासाठी हा दबाव होता, अशी चर्चा होती. यावर विवेक कोल्हे यांनी 'प्रवृती'कडे बोट दाखवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT