sharad pawar, prajakt tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure : जायकवाडीसाठी पाणी सोडण्यावरुन आमदार तनपुरेंचे मोठे विधान ; म्हणाले,"आमचे सरकार आल्यावर...!"

Jaykawadi Water Issue : नगर आणि नाशिकमध्ये एकीकडे विरोध होत असतानाच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून नेते एकवटले आणि त्यांनीही...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर-नाशिक जिल्ह्यातून मोठा विरोध झाल्यानंतरही जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणासाठी धरण समूहातून पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष आदेश शनिवारी दिले. त्यानंतर नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावल्यानंतर आता जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

आमदार आशुतोष काळे, शंकरराव गडाख या आमदारांनंतर आता प्राजक्त तनपुरे यांनीही नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात आमचे विचारांचे सरकार येणार याची खात्री असून आमचे सरकार आल्यानंतर या पाणी धोरणावर विचार करू असे मोठे विधान आमदार तनपुरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केले आहे.

जलसंपदा विभागाने नुकतेच नगर आणि नाशिक धरण समूहातून जायकवाडी धरणासाठीन8.5 टीएमसी पाणी सोडण्यासाठी आदेश काढले होते. या आदेशानंतर एकूणच नाशिक आणि नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास तीव्र विरोध समोर आला. नगर जिल्ह्यात विशेष करून उत्तरेतील सर्वच तालुक्यातील नेत्यांनी जायकवाडीला पाणी देण्यास विरोध केला होता.

या विरोधानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radharkrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी आणि प्रमुख नेत्यांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर जायकवाडीला पाणी सोडू नये असा एकमताने ठराव करून तो राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. हा ठराव राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याने मराठवाड्यातील नेत्यांनी विशेष करून सत्तेतील महायुतीतील नेत्यांनी विखे यांच्यावरही टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर आणि नाशिकमध्ये एकीकडे विरोध होत असतानाच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून नेते एकवटले आणि त्यांनीही जायकवाडीसाठी त्वरित पाणी सोडावे, जलसंपदाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मोठा दबाव वाढवला होता. अखेर काल जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर तर नगर जिल्ह्यातील निळवंडे, मुळा या धरणातून पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष आदेश दिल्यानंतर रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून 5000 क्यूसेक्स तर मुळा धरणातून 2000 क्यूसेक्स वेगाने जायकवाडी कडे पाणी झेपावत आहे. या पार्श्वभूमीवर राहुरीचे राष्ट्रवादीचे(शरद पवार गट) आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांनी जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष भेद बाजूला ठेवून सरकारकडे ठराव पाठवल्यानंतरही पाणी सोडले जात असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. भविष्यात आमच्या विचारांचे सरकार येणार याची मला खात्री आहे. त्यावेळी समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्याचा विचार करू असे मोठे विधान त्यांनी केले.

समन्यायी पाणीवाटप कायदा ज्यावेळेस झाला त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते असा आरोप आमच्यावर होतो. मात्र त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असलेले अनेक लोकं आता भाजपमध्ये गेलेले आहेत, अशी मिश्किल टिपण्णी आमदार तनपुरे यांनी केली . त्यावेळेस राहुरीमध्ये विरोधी पक्षाचा आमदार होता. तर माझ्या विरोधात निवडणूक लढलेले नेते त्यावेळी राष्ट्रवादी पक्षात होते असा लेखाजोखाही आमदार प्राजक तनपुरे यांनी यानिमित्ताने मांडला. त्याचबरोबर आता मुळा धरणातून पाणी सोडलेच आहे तर परिसरातील बंधारे भरून द्यावेत अशी आग्रही मागणी आमदार तनपुरे यांनी केली.(Jayakwadi Water Issue)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT