Muktainagar News: नागरी आणि राजकीय प्रश्नांवर होणारे आंदोलन नेहमीच दिसते. मात्र सरकारी महसुलाची चोरी आणि अवजड वाहनांची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी मुक्ताईनगर (जळगाव) येथील सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन केले. कर्की नाक्यावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) धावपळ उडाली.
प्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कारभार नेहमीच राजकीय पक्षांसाठी टिकेचा विषय असतो. अनेकदा राजकीय पक्ष याविरोधात आंदोलन करत असतात. मुक्ताईनगर येथे मात्र आरटीओला जागृत करण्यासाठी चक्क शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. अखेर संबंधित परिसरात आरटीओ तपासणी चौकी उभारण्याचे आणि महसूल बुडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी कर्की नाका, नायगाव नाका आणि पूरनाड गावातून होणाऱ्या अवजड आणि चोरट्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात राज्यशासनाचा महसूल बुडतो. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला तक्रारी दिल्या होत्या.
आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी १० ऑक्टोबरला त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन दिले होते. १५ ऑक्टोबरला त्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर १७ ऑक्टोबरला थेट आंदोलन करून 'आरटीओ'ची चांगलीच कोंडी केली.
विशेष म्हणजे या भागातून होणाऱ्या वाहतुकीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडतो. अवजड आणि कथित बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण आणून शासनाचा बुडणारा महसूल वाचवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
अखेर संबंधित भागात आरटीओ तपासणी चौकी उभारण्यात येईल आणि शासनाचा महसूल बुडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, जिल्हा संघटक छोटूभाई आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.