Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Urban : बँक बुडवणाऱ्यांची मालमत्ता जप्त होणार; महसूलमंत्र्यांची कारवाईची सूचना

Nagar Urban Bank Latest News : नगर अर्बन बँक बुडवणाऱ्यांचे धाबे दणाणले...

Pradeep Pendhare

Nagar Urban Bank Ahmednagar News :

नगर अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेले दोषी संचालक व अधिकार्‍यांसह थकबाकी असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता या जिल्हा प्रशासनाच्या रडारवर घेतल्या जाणार आहेत. पालकमंत्री Radhakrishna Vikhe-Patil यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहे. तातडीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, बँकेचे अवसायक, जिल्हा सहकार उपनिबंधक व ठेवीदार प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आणि कर्जदार, दोषी संचालक व अधिकार्‍यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव करण्याचे नियोजन करण्यासही सांगितले आहे.

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी शुक्रवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनानंतर पोलिस मुख्यालयात बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी व ठेवीदारांचे प्रमुख डी. एम. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विलास कुलकर्णी, बबईताई वाकळे, सुमन जाधव, दिनकर देशमुख, अवधूत कुक्कडवाल आदींनी मंत्री विखेंसमोर व्यथा मांडल्या. बँकेचा व्यवसाय परवाना रद्द होऊन सहा महिने होत आले आहेत. बँकेत कर्ज वितरणात गैरप्रकार झाले असून फॉरेन्सिक ऑडिटमधील मुद्यांनुसार पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष पोलिस पथकही नेमण्यात आले आहे. मात्र, बरेच आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध घेतला जावा. तसेच या आरोपींच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा व ठेवीदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन यानुसार तातडीने संबंधित सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन नियोजन व कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. (Ahmednagar Latest News) यातील प्रत्येक दोषींवर कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान, या घोटाळ्यातील दोन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक भाजपचा माजी नगरसेवक असून दुसरा व्यक्ती माजी संचालक आहे.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT