Nashik Voter List Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Voter List Controversy: निवडणूक आयोगाचा अनोखा भाईचारा; कांबळे, अभ्यंकर, पाटील असे 100 जण राहतात एकाच फ्लॅटमध्ये! मतदारयादीमुळे नवा वाद!

Voter List Nashik Shivsena UBT : मतदान चोरीचा मुद्दा पेटला असताना एकाच प्लॅटमध्ये तब्बल 100 मतदारांची नोंद असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिक घेतली आहे.

Sampat Devgire

Shivsena UBT News: नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयादीचा घोळ सप्रमाण सिद्ध केला होता. शहरातील मध्य, पूर्व, पश्चिम आणि देवळाली या चार मतदारसंघात साडेतीन लाख दुबार आणि संशयास्पद मतदार आढळले होते. तो वाद अद्यापही संपलेला नाही. त्यातच आणखी धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सिडको आणि इंदिरानगर भागातील मतदारयादी 331 मध्ये एकाच फ्लॅटमध्ये तब्बल 100 मतदार आढळले आहेत. त्या प्लॅटचा शोध कार्यकर्ते घेत आहेत.

या मतदारयादीच्या पान क्रमांक 18 वर चंद्रभागा सिताराम गुरुकुले या 464 क्रमांकाच्या मतदार आहेत. नंतर प्रवीण प्रल्हाद पाटील हे 43 क्रमांकावर दाखवले आहेत. विशेष म्हणजे या यादीत तब्बल 100 हून अधिक मतदार एकाच फ्लॅटमध्ये असल्याचे यादीत आहे. यादी तपासली असता रघुवीर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक दोन मध्ये कांबळे, पाटील, सांगळे, महाले, बिरारी, अभ्यंकर अशी आडनावे असलेले 100 मतदार एकचा प्लॅटमध्ये राहत असल्याचे दाखवले आहे.

या संदर्भात शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी नानावली परिसरात एकाच घरामध्ये 813 मतदार दाखविले होते. त्याची तक्रार केल्यावर प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.निवडणूक आयोगाच्या राज्याच्या कार्यालयात देखील नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र दुरुस्ती ऐवजी यादी योग्य असल्याचा दावा करण्यात आला.यामध्ये मोठे कारस्थान असण्याचा संशय आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संबंधित घर शोधून काढतील, असे गीते म्हणाले.

मतदार यादी दुरुस्तीचे आवाहन

नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश महापालिकेत होतो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी हीच यादी वापरली जाणार आहे. सत्ताधारी पक्षाला त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मतदार यादीचा घोळ हा भाजपकडे संशयाची सुई वळवतो. याबाबत थातूरमातूर खुलासा न करता यादी दुरुस्तीचे आव्हान स्वीकारावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT