Solapur Politics : कमरेतून मोडेन म्हणणाऱ्या उत्तम जानकारांवर मंत्री जयकुमार गोरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, तर...'

Uttam Jankar and Jaykumar Gore clash : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण माळशिरसचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर आणि भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.
Uttam Jankar vs Jaykumar Gore
Uttam Jankar vs Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur News, 26 Oct : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण माळशिरसचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर आणि भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.

आमदार उत्तम जानकर यांनी एका युट्युब चॅनेलशी बोलताना पालकमंत्री गोरेंना थेट कमरेतून मोडेन अशी धमकी दिली होती. जानकरांच्या याच धमकीला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कमरेखालीच मारतो, असं गोरेंनी म्हटलं आहे.

काल (ता. 25) नातेपुते येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्नेहमेळाव्यात जयकुमार गोरे बोलत होते. ते उत्तम जानकार यांना उद्देशून म्हणाले, 'या लोकांनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी काठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या, अजूनही त्याचे वळ तसेच आहेत आणि एका आमदारकीसाठी तू पाय चाटत गेलास, थू तुझ्या आमदारकीवर, अशा शब्दात त्यांनी जानकर यांच्यावर हल्लाबोल केला.

Uttam Jankar vs Jaykumar Gore
Daund Politics : अजितदादांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी शहराध्यक्षावर नगरपालिकेचं दबावतंत्र

तर मी पालकमंत्री झाल्यापासून कोणावरही अशा पद्धतीची टीका केली नाही. पण हे ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यांना सांगतो की, कुणाला शहाणपणा शिकवतोयस? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझा नाद करू नकोस.

Uttam Jankar vs Jaykumar Gore
Devendra Fadnavis : ज्या फलटणमध्ये डाॅक्टर तरुणीची आत्महत्या तेथेच आज मुख्यमंत्री फडणवीसांचा कृतज्ञता मेळावा, काय भूमिका मांडणार?

आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आपल्या वाटेला आलं, तर त्याला सोडत नाही, अशी धमकीवजा इशाराच त्यांनी जानकर यांना दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर उत्तम जानकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे. शिवाय निवडणुका जाहीर होण्याआधीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com