Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : 'निधी'ला कात्री लावत प्रशासनाने केली भुजबळांची कोंडी ?

संपत देवगिरे

Chhagan Bhujbal News : ज्येष्ठमंत्री असल्याने छगन भुजबळ नेहेमीच आपल्या मतदारसंघासाठी इतरांच्या वाट्याचाही निधी वळवितात, अशी तक्रार अन्य आमदारांची असते. मात्र यावेळी घडयाळाचे काटे उलटे फिरले आहे. समाजकल्याण विभागाने भुजबळांच्या सुचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने भुजबळ चांगलेच संतापले आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलेल्या कामांच्या यादीतील केवळ 10 टक्के कामांना निधी दिला आहे. हा निधी अतिशय तोकडा असल्याने येवला (Yeola) मतदारसंघातील कामांच्या प्रशासकीय मान्यता व तरतूद केलेला निधी दोन्हीही रद्द करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्याचे समजते. केवळ भुजबळच नव्हे तर अन्य काही आमदारांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांसाठी 2023 - 24 या आर्थिक वर्षासाठी समाजकल्याण विभागाने 54 कोटींच्या आराखड्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरण करताना केलेल्या मनमानीमुळे निर्माण झालेली ही नाराजी कोणते वळण घेते, याची उत्सुकता आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा नियोजन समितीला अनुसूचित जाती घटक योजनेसाठी निधी देण्यात येतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा परिषदेने यावर्षी या योजनेतून दलित वस्ती सुधार योजनेचा 54 कोटींचा आराखडा तयार केला असून त्यातून 650 कामे प्रस्तावित केली आहेत. नियोजन समितीला अनुसूचित जाती घटक योजनेतून प्राप्त झालेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतून ग्रामीण भागासाठी केवळ 27 कोटी मिळाले आहेत. कामांना मान्यता देताना समाजकल्याण विभागाने प्रत्यक्ष निधीची तरतूद करताना कोणताही निकष ठरवले नाहीत.

भुजबळ यांच्या कार्यालयाने येवला तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेतून विविध गावांसाठी 120 कामांच्या यादीतून विभागाने केवळ 10 टक्के कामांना किरकोळ स्वरूपात निधी दिला असून इतर कामांना निधी दिला गेला नाही. याउलट तालुक्यातीलच बळ यांनी शिफारस न केलेल्या अनेक कामांना भरघोस निधीची तरतूद केली आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT