Nashik Congress News : नाशिकमध्ये काँग्रेसच्या सर्वात मोठ्या ध्वजाची मिरवणूक

138th Foundation Day of All India Congress Party : स्थापना दिनानिमित्त सेवादलाच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केला सर्वात मोठा ध्वज, शहरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
Congress flag
Congress flagSarkarnama
Published on
Updated on

Nashik Congress News : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या 138 वा स्थापना दिन गुरुवारी देशभर साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने नाशिक शहरात विविध कार्यक्रम होत आहेत, मात्र नाशिक शहरातील कार्यक्रम वेगळ्याच कारणाने लक्षवेधी ठरला आहे आहे.

त्यासाठी गेले काही दिवस काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत तयारी केली आहे. शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. पक्षाचा सर्वात मोठा 8 फूट बाय 138 फूट लांबीचा ध्वज तयार करण्यात आला. आज सकाळी शहर काँग्रेस भवन येथून या ध्वजाची संवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Congress flag
Ashok Chavan News : `मी जिथे आहे, तिथेच बरा`.. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चव्हाण बोलले..

स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला आज नाशिक (Nashik) शहर काँग्रेस (Congress) सेवा दलाच्या वतीने शहराध्यक्ष ठाकूर यांच्या संकल्पनेतून सर्वात मोठा काँग्रेस पक्षाचा ध्वज तयार करण्यात आला होता. शहरात पक्षाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून विविध कार्यक्रम होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सकाळी शहर काँग्रेस कमिटीच्या प्रांगणात पक्षाचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या पक्ष ध्वजाची मिरवणूक सुरू झाली. हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून तिची सांगता झाली. मिरवणुकीत मर्दानी खेळ, लेझीम, पथक ढोल पथक होते.

माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe), माजी मंत्री शोभाताई बच्छाव, सेवा दलाचे अध्यक्ष ठाकूर, माजी नगरसेवक शाहू खैरे, राजेंद्र बागुल, लक्ष्मण धोत्रे, लक्ष्मण जायभावे, सुरेश मारू, वत्सलाताई खैरे, आशाताई तडवी, स्वाती जाधव, हनीफ बशीर, सिद्धार्थ गांगुर्डे, संतोष हिवाळे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(Edited by Amol Sutar)

Congress flag
Amol Kolhe News : कोल्हेंच्या निशाण्यावर पुन्हा अजितदादा; म्हणाले," तुम्ही मोठे आहात तर..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com