Samata Patsanstha And Ashok Kharat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Scam : समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात याच्या खात्याप्रकरणी गुन्हा दाखल, परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश

Shirdi police file FIR against Ashok Kharat and Rahata branch manager of Samata Nagari Patsanstha over fake account scam : अशोक खरात याने भक्तीत अंध केलेल्या भक्तांच्या कागदपत्रांचा वापर करून, पतसंस्थेत खाते सुरू करून त्यावर कोट्यवधींचा व्यवहार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आलं आहे.

Pradeep Pendhare

Ashok Kharat fake account case : अशोक खरात आणि समता नागरी पतसंस्थेतील अधिकाऱ्यांचे संबंध विशेष पथकाच्या तपासात समोर आले आहेत. अशोक खरात याची वासरदार खाते उघडण्यासाठी अनेकांची फसवणूक करून, त्यांच्या पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर केला आहे.

याप्रकरणी शिर्डीत अशोक खरात आणि समता नागरी पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक, या दोघांविरोधात शिर्डीत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही खाती उघडताना परिवहन विभागाच्या दोन सहायक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वतः स्वाक्षरी केल्याचं देखील उघडकीस आलं आहे. त्यांचीही चौकशी सुरू आहे. यामुळे समता नागरी पतसंस्थेकडून व्यवहारातील पारदर्शकतेचा करण्यात येणाऱ्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मुंबईतील (Mumbai) व्यावसायिक दिनेश परब यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. अशोककुमार खरात ऊर्फ कॅप्टन याने विश्वासाने, देवदर्शनासाठी जायचे असून, त्याच्या नोंदणीकरिता माझे व माझी पत्नी दिशा परब हिचे पॅनकार्ड, आधारकार्ड व छायाचित्र घेतले. परंतु पुढे या कागदपत्रांचा अशोककुमार खरात याने गैरवापर केला.

समता नागरी पतसंस्थेत दिनेश परब आणि दिशा परब यांच्या नावे प्रत्येकी दोन, अशी चार खाती 25 मे 2021 मध्ये उघडली. शाखेत खाते सुरू करून, त्यावर बनावट स्वाक्षरी करत, खात्यात मोठ-मोठ्या रक्कमांचा व्यवहार करण्यात आला. ही खाती उघडताना समता नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने आमच्या कागदपत्रांची व आम्ही प्रत्यक्ष हजर नसल्याची, आमची ओळखीची खात्री केली नाही, असे तक्रारीत दिनेश परब यांनी म्हटले आहे.

अशोक खरात (Ashok Kharat) आणि समता पतसंस्थेतील शाखा व्यवस्थापकाने आमची फसवणूक करून, पतसंस्थेत खाते उघडले. या खात्यांवर कोट्यवधींचा व्यवहार केला. या दोन्ही खात्या तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे, असे दिनेश परब यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आता पतसंस्थेतील या दोन्ही खात्यावर साडेसात लाख रूपये शिल्लक आहेत.

समता पतसंस्थेत ही खाते उघडताना बनकर वस्तीवरील विनोद बनकर हा साक्षीदार आहे. या साक्षीदाराला कधीही पाहिले नाही, असा देखील दावा दिनेश परब यांनी केला आहे. या खात्याला वारसदार म्हणून अशोक खरात असून, त्याला मोबाईल क्रमांक देखील त्याचाच आहे. पोलिसांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली आहे. शिर्डी पोलिसांनी अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या शिर्डीमधील शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

कागदपत्र खरी, सह्या बनावट

अशोक खरात याची समता पतसंस्थेत 57 खातेदारांची 100 खाती आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 57 पैकी 19 खातेधारकांची चौकशी केली आहे. त्यांचा जबाब नोंदवला आहे. खातेदारांची कागदपत्रे खरी असून, ती सुरू करण्यासाठी पतसंस्थेच्या खाते फाॅर्मवर केलेल्या स्वाक्षरी या बनावट आहेत. मुंबईत दिनेश परब यांच्या खाते फाॅर्म देखील बनावट स्वाक्षरी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT