Bank Accounts Frozen : शिर्डीतील ‘समताने’ गोठवलेल्या खरातच्या खात्यातील रक्कम समोर; नाशिकच्या जगदंब पतसंस्थेत 32 खाते!

Ashok Kharat frozen bank accounts investigation: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या बँक कारनाम्याची माहिती समोर आली असून, यात आर्थिक व्यवहाराच्या धक्कादायक बाबी गोपनीय ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.
Ashok Kharat Case: 32 Bank Accounts Found in Nashik Credit Society
Ashok Kharat Case: 32 Bank Accounts Found in Nashik Credit SocietySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat bank accounts frozen: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांच्या लैगिंक शोषण करण्याबरोबरच स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण झालेल्या राजकीय संबंधातून कोट्यवधी रूपयांची माया जमवली. दररोज कॅशचे बंडलं त्याच्या घरी जात होते. या पैशाचं पुढं काय झालं, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

अहिल्यानगरमधील समता नागरी पतसंस्था आणि नाशिकमधील जगदंबा नागरी पतसंस्थेत अशोक खरात याच्या खात्यांची माहिती समोर आली आहे. शिर्डीतील 'समता'मधील बँक खाती गोठवण्यात आली आहे. नामकर्ण आवारे यांच्या सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेत अशोक खरातची तब्बल 32 खाती असल्याचे तपासात समोर आले आहे.

शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पनाविरोधात बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी खरातच्या व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे.

यातच समता नागरी पतसंस्थेत त्याची खाती आढळली आहेत. तसंच वारसदार असलेली शेकडो बँक खात्यांची माहिती समोर आली. याशिवाय नाशिकमधील (Nashik) जगदंबा पतसंस्थेत देखील त्याची 32 बँक खाती असल्याचं समोर आलं आहे.

समता नागरी पतसंस्थेनी शिर्डी (Shirdi) पोलिसांच्या पत्रावरून लगेचच, त्याच्या बँक खात्याची माहिती दिली आहे. ही माहिती अवघ्या दोन तासांत पतसंस्थेकडून देण्यात आल्याचा दावा संचालक संदीप कोयटे यांनी केला आहे. अशोक खरात याची सर्व खाती गोठवण्यात आली असून, त्याच्या चार खात्यात 30 लाखांची रक्कम आहे.

Ashok Kharat Case: 32 Bank Accounts Found in Nashik Credit Society
Bank Fraud : अशोक खरातचा 'बँक'नामा! 400 बँक खात्यांची तपासणी होणार, 130 खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार

अशोक खरातला संबंधित पैसे आले कोठून आणि दिले कुणाला, याचा शिर्डी पोलिस तपास करत आहेत. मोठ्या रकमा आॅनलाईन ट्रान्सफर झाल्या आहेत. खरात याच्या आर्थिक व्यवहाराबाबत गोपनीयता ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचनाही पतसंस्थेला देण्यात आल्या आहेत.

Ashok Kharat Case: 32 Bank Accounts Found in Nashik Credit Society
Rahuri Bypoll : राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना मैदानात, कट्टर कार्यकर्त्यानं नेला उमेदवारी अर्ज; महायुतीमधील भाजपची डोकेदुखी वाढली

नाशिकच्या सिन्नरमधील नामकर्ण आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेचे संस्थापक असून, त्यांच्या पतसंस्थेत अशोक खरातची तब्बल 32 खाती असल्याचं तपासात समोर आलं आहे. एकाच व्यक्तीची एवढी खाती कशासाठी? आणि त्यातून नेमके कोणते आर्थिक व्यवहार पार पडले? याचा तपास शिर्डी पोलिसांनी सुरू केला आहे. आवारे आणि खरात यांच्या संबंधांवरून शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com