Ashok Kharat Politics Nashik Collector Post Buzz Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Politics: अशोक खरातचा `रिमोट कंट्रोल` अन् नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसाठी फिल्डिंग; ती महिला अधिकारी कोण? प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधान!

Ashok Kharat Female IAS Officer Fielding for the Post of District Collector: भोंदू तांत्रिक अशोक खरातची उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मंत्र्यांशी असलेली धक्कादायक लिंक आली चर्चेत.

Sampat Devgire

Ashok Kharat News: कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधांबाबत सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनी हात झटकले आहेत. मात्र हे दावे किती तकलादू आहेत हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भोंदू कॅप्टन खरात सरकारच्या उच्च पदांवरील अनेक बदल्यांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचे पुढे आले आहे.

भोंदू कॅप्टन अशोक खरात अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यासाठी हस्तक्षेप करीत होता. त्यासाठी त्याचा संपर्क सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांशी होता. अनेकदा बदल्यांमध्ये मंत्र्यांची थेट शिफारस केली जात होती.

यामध्ये थेट जिल्हाधिकारी पदांच्या नियुक्तीतही अशोक खरात रस घेत होता हे उघड झाले आहे. खरात याच्या संपर्कात आलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याचे प्रकरण पुढे आले आहे. या आयएएस महिलेने थेट नाशिकच्या जिल्हाधिकारी पदासाठी लॉबिंग केले होते.

सध्या पुणे येथे संचालक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला कोविड काळात नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून मुदतवाढ दिली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली. तेव्हा जिल्हा परिषदेत असलेल्या एका आयएएस महिला अधिकाऱ्यांच्या अपेक्षा अचानक वाढल्या.

ही महिला अधिकारी अशोक खरात याच्या नियमित संपर्कात होती. अशोक खरातला विविध प्रकरणात मदत करण्यातही तिचा सहभाग होता, असे बोलले जाते. त्यातूनच संपर्क वाढल्याने तिने नाशिकच्या जिल्हाधिकारी पदासाठी या महिलेने लॉबिंग केले होते.

मात्र प्रशासनातील हिशत्रूंनी त्यात अडथळे आणले. या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे प्रकरण थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुरेसा अनुभव नसल्याने जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीत प्रतिकूल शेरा मारण्यात  आला. त्यात किमान एका आदिवासी जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव हवा, असा निकष होता.

या प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याच्या मार्गात अन्य एका प्रतिस्पर्धी महिला अधिकाऱ्याने देखील अडथळे आणले. संबंधित महिला बराच काळ नाशिकमध्ये कार्यरत होती. या महिलेने खरात मार्फत लॉबिंग झाल्यावर आपला दावा जिल्हाधिकारी पदावर ठोकला होता.

यानिमित्ताने भोंदू कॅप्टन खरात याची सत्ताधारी पक्षात किती चलती होती हे स्पष्ट आहे. वरिष्ठ स्तरावरील अनेक बदल्यांमध्ये त्याचा रस होता. इथूनच थेट मंत्र्यांमार्फत बदल्यांमध्ये लॉबिंग सुरू असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT