Assembly Session : मंत्रालयातही जादूचे पाणी देणारे अशोक खरात नामक अधिकारी! मुनगंटीवारांचा वार, अध्यक्षांनी उगारले कारवाईचे अस्त्र

Legislative committee controversy Maharashtra : जशी अंधश्रध्दा तशी अंधबुध्दीही धोक्याची आहे. हे अधिकारी म्हणजे अशोक खरातची आधुनिक रुपे आहेत, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Rahul Narwekar warning action : भोंदूबाबा अशोक खरात याचे दररोजन नव कारनामे समोर येत असतानाचा विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांचाही अशोक खरात गुरू होता. काही मंत्रीही खरातकडे गेल्याचे समोर आले आहे. त्यावरूनच आज भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवरही आसूड उगारला आहे. त्याला कारणीभूत ठरला विधिमंडळ आश्वासन समितीचा अहवाल.

आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी समिती अहवाल सादर करत असताना अधिकारी बैठकांना अनुपस्थित राहत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तब्बल मंत्री विधिमंडळात दिलेली तब्बल ५ हजारांहून अधिक आश्वासने प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अधिकारी समितीसमोर येत नसल्याचे सांगितले. तसेच यापुढे अधिकारी उपस्थित न झाल्यास हक्कभंग आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

राणांच्या या विधानानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, जशी अंधश्रध्दा तशी अंधबुध्दीही धोक्याची आहे. हे अधिकारी म्हणजे अशोक खरातची आधुनिक रुपे आहेत. आश्वासन समितीसमोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात. फक्त अशोक खरातच मंत्र्यांना फसवितो असे नाही. अधिकारीही फसवतात आणि मंत्री आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी आश्वासन मागे घेतोय.

Sudhir Mungantiwar
Election Commission : धक्कादायक : निवडणूक आयोगाने पक्षांना पाठविलेल्या पत्रावर भाजपचा शिक्का; कबूली देत अधिकारी सस्पेंड

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर दिलेले आश्वासन अधिकारी आम्ही हे पूर्ण करणार नाही, असे सांगतात. या घटनांवर आज लक्ष दिले नाही आणि जादूचे पाणी असेच लोकशाहीवर भारी झाले तर हे वाईट आहे. या सभागृहाला जर कामचोर अधिकाही घाबरत नसतील तर कारवाईचा निर्णय घ्यावा. हा विषय गंभीरपणे घ्यावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar
Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; IPS सातपुतेंनी जारी केले 2 मोबाईल क्रमांक अन् 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्याची गंभीरपणे दखल घेतली. समित्या या विधिमंडळाच्या आत्मा समजल्या जातात. समितीचे कामकाज करण्याबाबत अधिकारी विलंब करत असतील किंवा समितीसमोर येत नसतील तर यापेक्षा गंभीर बाब होऊ शकत नाही. हे मुळीच सहन केले जाणार नाही. यापुढे जर कोणत्याही समितीत अधिकाऱ्याची अनुपस्थिती माझ्याकडे कळविण्यात आली तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com