Minister Dada Bhuse discussed with the Police Commissioner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Politics : पोलिसांना फ्री हॅण्ड', एकनाथ शिंदेंच्या 'दादा'कडून भाजपची कोंडी?

Dada Bhuse puts BJP under pressure : नाशिकमध्ये भाजपचे दोन माजी नगरसेवक गंभीर गुन्ह्यात अटकेत आहेत. त्यावरुन विरोधकांनी भाजपला घेरलं. पण आता मित्रपक्ष शिवसेनाही भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी वाढली असून खून सत्र सुरु आहे. भाजपचे दोन माजी नगरसेवक हे खुनाच्या गुन्ह्यांत अटकेत आहेत. त्यावरुन विरोधकांकडून सुरुवातीपासूनच भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना(शिंदे गटानेही आता भाजपला यावरुन कोंडीत पकडले आहे.

राज्यात सध्या पूरस्थिती आहे. नाशिकमध्येही गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे पूर पाहणी दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. अशात शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाजन यांच्या आधी पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेऊन भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून त्यापार्श्वभूमीवर मंत्री भुसे यांनी काल थेट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दालनात बैठक घेत शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम पोलिस आयुक्तांना दिला. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरीही पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करा अशा सूचना थेट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दादा भुसे यांनी दिल्या.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. परंतु खुनाच्या प्रकरणांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील यांना अटक झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांना मुद्दा मिळाला. यावरुन भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याला व नाशिकमधील गुन्हेगारी वाढविण्यास भाजपच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच विरोधकांपाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटानेही गुन्हेगारीवरून आपल्या मित्र पक्षाला घेरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते.

महापालिका निवडणुक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढवणार असल्याचे जवळपास चित्र आहे. याआधीही विरोधी पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे आकर्षित करुन प्रवेश देण्याची दोन्ही पक्षांमधील स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. त्यात आता निवडणुकीची पूर्व तयारी सुरु झाल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक उफाळेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचाच भाग म्हणून आपला पक्ष नामोनिराळा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न दादा भुसेंनी या माध्यमातून केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT