Girish Mahajan : काय काय बोलताय, किती शिव्या घालताय.. महाजन एकाचवेळी ठाकरे - राऊत दोघांवर बरसले

Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut : नाशिकमध्ये पूरग्रस्त भागाची पाहाणी करत असताना गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत दोघांना आपल्या निशाण्यावर घेतलं.
Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवरून महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे. परंतु दसरा मेळावा रद्द करून उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करायला हवी, असे आवाहन करत भाजपनेही उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेल्या मागणीनंतर भाजप नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंना कात्रीत पकडलं आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन यांनीही या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. नाशिकमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना महाजन माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे नुकसान झालेल्या भागात पोटतिडकीने पर्वा तिथे गेले, शेतकऱ्यांसाठी ज्या भाषेत ते बोलत आहेत, ज्या भाषेत वक्तव्य करत आहेत त्यांनी ते केले पाहिजे. तसं वागले पाहीजे असं सांगत दसरा मेळावा रद्द करून त्यांनी पूरग्रस्तांना मदत करायला हवी, असं महाजनांनी सूचित केलं.

मागच्या वेळेला मला आठवतं की, उद्धवजी पूरग्रस्त परिस्थिती बघायला आले, खाली उतरल्याबरोबर त्यांना लाल कार्पेट होतं. का तर म्हणे त्यांची चप्पल चिखलाने भरु नये, पाण्यात ओली होऊ नये . मी तु्म्हाला फोटो दाखवतो त्यांचे असं महाजन म्हणाले. सरकारमध्ये असताना यांची भाषा वेगळी होती, आता विरोधात आहे तर वेगळी आहे.

Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
Girish Mahajan : पूर्वी जे झालं ते झालं, आता भ्रष्टाचार होऊ देणार नाही; मंत्री महाजन नेमकं कशाबद्दल बोलले?

यावेळी महाजन यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्र सोडलं. राऊत साहेब काय काय बोलताय, काय शिव्या घालताय... किती असंसदीय भाषा ते बोलत आहेत. तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या मागे मागे गेले तासभर आणि निघून आले. आम्ही पंधरा दिवसांपासून फिल्डवर आहोत. तुम्ही एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा..ते नाही होत यांच्याकडून..फक्त सकाळी उठलं की, वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची याशिवाय ते काही करत नाही असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan on Uddhav Thackeray and Sanjay Raut
Uddhav Thackeray : मिलिंद नार्वेकरांची एकच पोस्ट, अन् भारत- पाक सामन्यावरुन उद्धव ठाकरेंनी उठवलेल्या रानात 'पाणी'

करोना काळात उद्धव ठाकरे हे कधी घराबाहेर पडले नाही. त्यावेळेचे यांचे पराक्रम सगळ्यांना माहित आहे. राऊत साहेब बोलायला लावू नका तुम्ही काय काय केलं ते...असा इशारा महाजन यांनी दिला. तसेच मुंबईत व नाशिकमध्येही ठाकरे -मनसे एकत्र येण्याआधीच महापौर पदावरुन दावा करताय असा टोला हाणत घोडा मैदान समोर आहे. आपलं कर्तुत्व दाखवा असं महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com