
Nashik Political News : नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत असून खून, हाणामारी, चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम शहर पोलिसांना दिला आहे.
नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात काल (दि. 29) शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली.
यावेळी मंत्री भुसे बोलत होते. गुन्हेगारीमुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून, याची गंभीर दखल मंत्री भुसे यांनी घेतली. पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आगामी सण , उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिस विभागाने अधिक दक्ष रहावे, अशा सूचना भुसेंनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना केल्या.
यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्ह्यांची माहिती मंत्री भुसे यांना दिली. नुकत्याच नाशिकमध्ये घडलेल्या काही गंभीर गुन्ह्यांमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासंदर्भात आयुक्तांनी मुद्दा उपस्थित करताच गुन्हेगारी घटनांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरीही पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करा अशा सूचना भुसेंनी केल्या.
नाशिक शहर शांत व सुरक्षित शहर असावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी रस्त्यावर पोलिस दिसला पाहिजे तरच, गुन्हेगार, विधीसंघर्षितांवर वचक बसेल. अल्पवयीन मुलांकडून घडत असलेल्या गुन्ह्याच्या घटना लक्षात घेता शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवावे. यासह रात्रीची गस्त वाढविण्यात यावी.
शाळा व महाविद्यालय परिसरातही विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपायायोजना कराव्यात अशा सूचना भुसेंनी केल्या. अल्पवयीन गुन्हेगारी संदर्भात राज्यस्तरावरून कायद्यात काय बदल केला जाऊ शकतो हा मुद्दा देखील शासनाच्या विचाराधीन आहे. विधीसंघर्षिताचे वय कमी करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरूअसल्याचे मंत्री भुसेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान यावेळी जागरूक नागरिकांनी टवाळखोरांबाबतची माहिती सीपी व्हॉटसअॅप ९९२३३२३३११ यावर द्यावी असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी केले. 66 गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून, तातडीने कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.