Nashik District Development Planning Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan: अडीच वर्षांनंतर 'डीपीडीसी' बैठक; गिरीश महाजनांसमोर 1 हजार कोटी खर्चाचे आव्हान, विरोधकांनी बाह्या सरसावल्या!

Nashik District Development Planning Meeting: नाशिक जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर निधी खर्च, दुष्काळी उपाययोजना आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांचा आढावा घेण्याचे आव्हान असणार आहे.

Sampat Devgire

Nashik politics: अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होत आहे. दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे अनेक अडचणी आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची पूर्तता होणार का? हा गंभीर पेच आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन मंडळाच्या १५५१ कोटींच्या नियोजनापैकी आतापर्यंत अवघे 465 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे प्रमाण अवघे 30% आहे. त्यामुळे हे त्या चार महिन्यात 1000 कोटींचा खर्च कसा होणार ही गंभीर समस्या आहे.

जिल्ह्यातील 15 पैकी 14 तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. या सर्व तालुक्यांमध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचा मोठा दबाव या आमदारांना सोसावा लागत आहे. अशा स्थितीत टंचाईसाठी निधी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे.

जिल्ह्यात आणि शहरात सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अनेक कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर 28 महिन्यानंतर होणाऱ्या या बैठकीत विविध कामांवरून खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. गेली 19 महिने जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. पालकमंत्री नसल्यामुळे अनेक समस्या आणि तांत्रिक अडचणी आहेत. महाजन यांना पालकमंत्री म्हणून हा गुंता सोडवावा लागणार आहे.

दरम्यान आमदारांच्या आणि खासदारांच्या आग्रहामुळे दुष्काळी कामांसाठी विशेष तरतूद करण्याची लगबग प्रशासनाने केली आहे. ग्रामीण भागात नियोजन करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. शासनाने देखील आमदारांसाठी वेगळा निधी उपलब्ध केला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागांना दोन दिवसांपूर्वीच अलर्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यामुळे प्रशासन निधी आणि विकास कामांच्या खर्चाचा गांभीर्याने आढावा घेत आहे

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तिन्ही खासदार विरोधी पक्षाचे असल्याने त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात उपेक्षित ठेवल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे पडसाद जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यातून कसा मार्ग काढतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT