School Assessment: मुख्याध्यापकांनो, तयारी ठेवा! राज्यातील 540 शाळांचे त्रयस्थ मूल्यांकन होणार; 60 दिवसांची डेडलाइन

Maharashtra School Evaluation: महाराष्ट्रातील निवडक ५४० शाळांचे NABET-QCI संस्थेमार्फत त्रयस्थ मूल्यांकन केले जाणार आहे. SQAAF अंतर्गत ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Maharashtra School Evaluation
Maharashtra School EvaluationSarkarnama
Published on: 
Updated on: 

SCERT News: शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक पारदर्शक आणि काटेकोर तपासण्यासाठी राज्यातील ५४० शाळांची निवड त्रयस्थ मूल्यांकनासाठी करण्यात आली आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या कामाची जबाबदारी 'NABET-QCI' या शासकीय स्वायत्त संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून पुढील ६० दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे.

गुणवत्तेची चाळणी कशी झाली?

त्रयस्थ मूल्यांकनासाठी निवडलेल्या ५४० शाळांची यादी टप्प्याटप्प्याने गाळणी करून निश्चित करण्यात आली आहे. त्यामागची आकडेवारी पुढीलप्रमाणे

  • मागील शैक्षणिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये राज्यातील एकूण १,०२,६७५ शाळांनी आपले स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले होते.

  • स्वयं-मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांमधून २०२५-२६ मध्ये १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण झाले.

  • बाह्य मूल्यांकनातील सर्वोच्च गुणांकनाच्या आधारे ५४० शाळांची त्रयस्थ तपासणीसाठी निवड झाली.

  • या ५४० शाळांमध्ये 'अ+' श्रेणीतील ४२८ शाळांचा समावेश आहे.

  • 'अ' श्रेणी मिळवलेल्या १,०६७ शाळांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ११२ शाळांचीही या यादीत निवड करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष भेटी आणि डिजिटल प्रक्रिया

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांनी सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मूल्यांकनादरम्यान पळवाट राहू नये आणि कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी काही ठोस निकष ठरवण्यात आले आहेत.

तपासणीची संपूर्ण प्रक्रिया 'Pi-Jam फाउंडेशन'ने तयार केलेल्या ॲप किंवा लिंकच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक निवडक शाळेला 'NABET-QCI'चे दोन प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देतील. शाळांच्या मूल्यांकनाचे वेळापत्रक आणि शाळानिहाय नियोजन संस्थेकडूनच कळवले जाणार आहे.

Maharashtra School Evaluation
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक

सत्कार समारंभास मनाई

या मोहिमेदरम्यान प्रशासकीय शिस्त आणि औपचारिकता जपण्यावर भर देण्यात आला आहे. मूल्यांकनासाठी पथक शाळेत आल्यानंतर कोणताही सत्कार समारंभ किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्याध्यापकांना देण्यास सांगण्यात आले आहे.

Maharashtra School Evaluation
Baramati Crime: विश्वास संपादन केला अन् विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला 20 वर्षांचा तुरुंगवास, 45 हजारांचा दंड

धोरणात्मक पार्श्वभूमी

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पुण्यात राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची स्थापना केली. त्याच दिवशीच्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार SQAAF आराखडा लागू करण्यात आला. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन, बाह्य मूल्यांकन आणि त्रयस्थ मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यामागे आहे. या सर्व प्रक्रियेसाठी ०२०-२४४७८१२२ हा संपर्क क्रमांक आणि `sqaafmh@maa.ac.in` हा ईमेल आयडी परिषदेकडून देण्यात आला आहे.

Maharashtra School Evaluation
Teacher News: शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून 'डिजिटल असहकार'! प्रशासकीय WhatsApp ग्रुप सोडणार; ऑनलाइन कामांनाही नकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.