Kolhapur Politics: राजेश क्षीरसागरांकडून कोल्हापुरात पूर नियंत्रण कामाचं उद्घाटन; सांगलीत निमंत्रणावरून वाद, प्रकरण कोर्टात!

Kolhapur Sangli Flood Control Project: सांगलीतील ५०८ कोटींच्या पूर नियंत्रण कामाच्या उद्घाटनावरून वाद; निमंत्रण आणि निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची न्यायालयात धाव.
sangli miraj kupwad municipal corporation
sangli miraj kupwad municipal corporationsarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: दरवर्षी येणाऱ्या महापुरातुन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांला वाचवण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली असून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात 500 कोटींच्या कामाचं उदघाटन केले.

सांगली महापालिका क्षेत्रात तब्बल ५०८ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. मात्र कोल्हापुरात झालेल्या उद्धघाटनाच्या कार्यक्रम आता मानपानावरून चर्चेत आला आहे. सांगलीच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट याचा जाब प्रशासनाला विचारला असून त्यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे.पदाधिकाऱ्यांनी थेट न्यायालयात धाव घेऊन यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर नियंत्रणसाठी काम होतं असताना सांगलीतील एकाही पदाधिकाऱ्याला निमंत्रण नव्हते. शिवाय अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना नाही का? असा थेट जाब विचारला आहे. शिवाय जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार, खासदार, महापौर, आयुक्त नाहीत का? त्यामुळे जाणूनबुजून सांगली करांना डावलले कां? असा सवालही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

दरवर्षी सांगली शहराला महापुराच्या पाण्याचा फटका बसतो. जागतिक बँकेने याची दखल घेऊन. जवळपास 3200 कोटी रुपयांचा कामाचा आरखाडा मंजूर असल्याचे सांगितले जाते. या प्रकल्पामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशी अशा असताना आता कामाच्या उदघाटनामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मात्र, प्रकल्पाच्या कामांचे नियोजन, निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणीच्या पद्धतीवरून महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामांवरून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आधीच वातावरण तापलेले असताना प्रारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

महापालिकेच्या ५०८ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया कायद्याला धाब्यावर बसवून राबविण्यात आली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल केली आहे. सरकारला पुढाकार घेऊन प्रशासनाने आम्हाला अंधारात ठेवले आहे. सभागृहात किंवा स्थायी सभेत हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र तसें न करता परस्पर निविदा मंजूर केली आहे. आता आम्ही न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू. त्यानंतरच प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.