Minister Ashok Uike Inspects Jopul Ashram School Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Uike : यापेक्षा गायीचा गोठा बरा, मंत्री अशोक उईके यांचे नाशिकमधील 'ती' आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश...

Ashok Uike Inspects Jopul Ashram School : नाशिक जिल्ह्यातील जोपूळ आश्रमशाळेत मंत्री अशोक उईके यांनी अचानक पाहणी केल्याने शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. शाळेची अवस्था पाहुन प्रशासनाची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली.

Ganesh Sonawane

Ashok Uike Nashik Ashram School Inspection : आदिवासी आश्रमशाळांतील गैरसोयी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला असून त्यावरुन आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. अशात आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (दि. १७) नाशिक जिल्ह्यातील जोपूळ येथील अनुदानित आश्रमशाळेला अचानक भेट देत पाहणी केली. दिंडोरी तालुक्यात ही शाळा आहे.

शाळेतील किचनची त्यांनी पाहणी केली. किचनची गुरांच्या गोठ्यासारखी झालेली दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी साधे पलंगही नसल्याचे पाहून मंत्री उईके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी अधिकाऱ्यांना शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देत विद्यार्थ्यांना अन्य शाळेत दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

गायिचा गोठा बरा असे किचन आहे. अशा पद्दतीने तुम्ही आमच्या आदिवासी मुलांना जेवण देता का? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता व सुविधा, तेथील अस्वच्छता व किचनची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी याबाबत अधीक्षकांना थेट जाब विचारला.

गायिचा गोठा बरा असे किचन आहे. अशा पद्दतीने तुम्ही आमच्या आदिवासी मुलांना जेवण देता का? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. विद्यार्थ्यांना दिले जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता व सुविधा, तेथील अस्वच्छता व किचनची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी याबाबत अधीक्षकांना थेट जाब विचारला.

अचानक दौरे करणार

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील अनेक आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. यावर भाष्य करताना मंत्री उईके यांनी राज्यातील अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये अशाच प्रकारचे प्रकार सुरू असल्याचे सांगत, अचानक दौरे करून या गैरव्यवस्थेचा पर्दाफाश केला जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, ऑगस्टमध्ये याच शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने प्राण गमावले आहे. विद्यार्थ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आदिवासी संघटनेचे प्रभाकर फसाळे व विकी मुंजे यांनी विद्यार्थ्याच्या मृतदेहाची झालेली हेळसांड मंत्री उईके यांच्या निदर्शनास आणून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT